सामाजिक कार्यकर्त्या मा.गीताताईं गायकवाड यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान💐💐💐

0

नाशिक : सामाजिक कार्यकर्त्या मा.गीताताईं गायकवाड यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला,महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शांती आनंद एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगूर नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या मा. गीताताई गायकवाड यांचा कारगिल योद्धा मा. नायक दिपचंद जी फौजि यांचे हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान पत्र ट्रॉफी मेडल असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी अध्यक्ष श्री विजयकुमार विंगळे तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या पुरस्कारासाठी सर्व अंगणवाडी सेविका /मदतनिस ताईं यांच्या कडून अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here