आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते मोहन शिंदे यांना 2022 चा युथ आयकाँन हा पुरस्कार प्रदान

0

पेठ वडगांव : (प्रतिनिधी) पेठ वडगांव (ता.हातकणगंले) येथील भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष व वडगांव न्युज , साप्ताहिक वडगांव परिसर संस्थापक अध्यक्ष श्री मोहन शिंदे यांना बंडखोर सेनापक्ष बंडखोर मिडिया ग्रूप आयोजित बंडखोर सेना पक्षाचा 9 वा तर लढवय्या महाराष्ट्र न्युजचा 2 रा वर्धापणदिन निमित्त युथ आयकाँन पुरस्कार देण्यात आला.जिवनात विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक , शैक्षणिक, वा इतर सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठविणाऱ्या अनेक युवक युवतींना 2022 चा “युथ आयकाँन” हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांनी भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या सामाजिक व उल्लेखनीय कामगिरी बद्दल तसेच 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिलादिन दिवशी वडगांव न्युज डिजीटल मिडीया न्युज पोर्टल सुरू करून जिल्ह्यातील व राज्यातील ताज्या घडामोडी जनतेपर्यंत पोहचवून तसेच “वडगांव न्युजच्या” माध्यमातून सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवून न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिकपणे उत्कृष्ट कार्य केले आहे.याची दखल घेऊनत्यांना बंडखोर मिडिया ग्रूप वतीने 2022 चा “युथ आयकाँन” हा मानाचा पुरस्कार त्यांना गुरुवार दि. 01 मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिवशी हातकणगंले विधान सभेचे दमदार आमदार राजूबाबा आवळे यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी भटका समाज मुक्ती आंदोलन अध्यक्ष भिमराव साठे बापू , स्वराली शिंदे , बंडखोर मिडिया ग्रूप अध्यक्ष शिवाजीराव आवळे, नगरसेविका नम्रता ताइगडे, मा.उपनगराध्यक्षा प्रविता सालपे , शिवानी आवळे , अभिनेत्री श्री मेसवाल मँडम आणि अश्विनी इरोळे,एनएसजी कमांडो मुकूंद वासुदेव, प्रसिद्ध निवेदक , कवी कृष्णात बसागरे (सर) बंडखोर सेना पक्षाचे व मिडिया ग्रूपचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here