शिवसेनेचे उदय जाधव यांच्या दणक्याने कोकण नगरच्या पादचारी पुलाच्या बांधकामाला झाली सुरुवात

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: विरार शहरातील मनवेलपाडा विभागात १५०० पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कोकण नगरच्या नाल्याचे व पादचारी पुलाच्या बांधकामाचे भूमिपुजन स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून मागील अडीच वर्षापूर्वी झालेले असताना व ०६ महिन्यात काम पूर्ण करण्याचा कालावधी असताना देखील आज पर्यंत या ०३ पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आलेले नव्हते. नाल्याचे बांधकाम देखील धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे असल्याने याविषयी स्थानिक रहिवाशी व पदाधिकारी यांनी शिवसेना “मातोश्री” जनसंपर्क कार्यालय येथे येऊन शिवसेना विरार उपशहरप्रमुख श्री.उदय अ.जाधव यांच्याकडे आपली समस्या मांडली.तेथील स्थानिक नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कोकण नगरचा रस्ता, नाल्याचे निकृष्ट बांधकाम व पादचारी पुल या समस्येची त्वरीत दखल घेत कोकण नगर मित्र मंडळ व शिवसेना शिष्टमंडळासह वसई-विरार महानगर पालिकेचे आयुक्त मान.श्री.अनिल कुमार पवार साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व आयुक्त साहेबांच्या आदेशाने महानगरपालिकेचे अभियंता श्री.आर.के.पाटील साहेब यांनी स्थानिक रहिवाशी व शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख श्री.तुकाराम भुवड, श्री.संजय चव्हाण, महिला आघाडीच्या प्रमुख सौ.रोशनी रा. जाधव, युवासेनेचे रोहित कदम यांच्यासह कोकण नगर विभागातील समस्येची पाहणी करून नाल्यावरील जुने पुल तोडुन नवीन पादचारी पुलाचे बांधकाम तसेच अपुर्ण असलेल्या नाल्याचे बांधकाम गतीने सुरू करण्याचे आदेश दिले.त्याप्रमाणे मागील अडीच वर्षांपासुन प्रलंबित असलेला व शेवटचे घटके मोजत असलेला कोकण नगर नाल्यावरील मुख्य पादचारी पुल तोडुन आज नवीन पुलाच्या बांधकामाला शिवसेनेच्या पाठपुराव्याने सुरुवात करण्यात आलेले आहे. इतरही ०२ पुल तसेच नाल्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल असे महानगरपालिकेकडुन सांगण्यात आलेले आहे त्याबद्दल कोकण नगर मित्र मंडळाने शिवसेनेचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here