इंधनाचा टँकर नाल्यात उलटल्यामुळे हजारो लीटर इंधन रस्त्यावर

0

मनमाड : ( प्रतिनिधी निलेश व्यवहारे) पानेवाडी गावाजवळ इंधनाचा एक टँकर नाल्यात उलटल्यामुळे हजारो लीटर इंधन रस्त्याने वाहू लागले. ही घटना नागरिकांना कळताच काहीनी मिळेल त्या भांड्यांमध्ये हे इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पानेवाडी गावाजवळ आज दुपारी इंधनाने भरलेला टँकर एम.एच.19 झेड- 9988 हा टँकर नाल्यामध्ये उलटला. टँकर इंधनाने भरलेला असल्यामुळे सर्व इंधन रस्त्यावर सांडले. रस्त्याने इंधन वाहू लागले. त्यामुळे नागरिकांनीही ड्रम, पातेले घेऊन येत इंधन भरुन नेले. ही घटना कंपनीला कळाल्यानंतर तातडीने कंपनीचे अधिकारी, कर्मचारी क्रेन आणि फोम बाटल्या घेऊन आल्याने पुढील अनर्थ टळला. नवीन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे खडीचे गंज पसरलेले आहेत. त्यामुळे टँकर उलटल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here