कासार पिंपळगाव च्या बिरोबा (विरभद्र) मंदिरात चोरी,दानपेटी सह लंगर पळविला,ग्रामस्थांना पोलीसांचे सतर्कतेचे आदेश

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर) संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बिरोबा मंदिरातील दानपेटी सह लोखंडी लंगर चोरट्या कडून पळविन्यात आला आहे.ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे घडली आहे.याबाबत सविस्तर व्रुत्त असे की मंगळवारी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी बिरोबा मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी सह लोखंडी लंगर पळवून नेला आहे.बुधवारी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे सेवक हे महापुजा करण्यासाठी गेले असता मंदिराचे कुलूप तोडल़ेले दिसले.आत डोकावून पाहिले असता मंदिरात दानपेटी आणि लंगर दिसला नाही तेव्हा गावातील सोसायटीचे माजी चेरमन संभाजी गोविंद राजळे,जेष्ठ नेते सोपानराव तुपे,ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे,अनिल नजन यांना बोलावून घेऊन सदरची घटना दाखवली तेव्हा सर्वांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे सांगितले. या बाबद मंदिराचे सेवक अनिल नजन आणि सुनिल नजन यांनी याबाबत पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३७३/२०२२, कलम ३५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या मध्ये मंदिरातील दानपेटी आणि लंगर चोरीला गेल्याचे नमूद केले आहे.शेवगाव विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुदर्शन मुंढे,पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे,कासार पिंपळगाव बीटचे पोलिस हेड काँन्स्टेबल अमोल कर्डीले,ठाणे अंमलदार अनिल बडे,आर आर बडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अहमदनगर येथून ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला तात्काळ पाचारण केले होते. श्वानाने मंदिराच्या सभामंडपातच गोल घिरट्या घातल्या. पोलिसांनी परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत लवकरात लवकर आरोपीला अटक करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. कासार पिंपळगावात बाळु पगारे यांचे दुकानातून झेरॉक्स मशीन, अंगणवाडी तील लहान मुलांचे साहित्य, संतोष जगताप, महादेव राजळे यांच्या शेळ्या चोरीला गेल्या आहेत. शेतकऱ्यांचे विहीरी वरील विजपंप ही चोरीला गेले आहेत.कासार पिंपळगाव हे शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका ताई राजळे यांचे गाव आहे.या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन जन सामान्यांमध्ये रात्रीच्या वेळी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.तपासाच्या द्रुष्टीने पोलिसांनी परिसरात बसवलेल्या सीसीटीव्हीत दिसणाऱ्या संशयीतांची धरपकड करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन ,स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here