खा . नवनीत राणा यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्र शासनावर जातीयवादी व बदनामीकारण खोटे आरोप केल्याने त्यांच्यावर कलम ( IPC 499,500,211 ) अन्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी

0

मनमाड :  ( प्रतिनिधी :  निलेश व्यवहारे ) खा . नवनीत राणा यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्र शासनावर जातीयवादी व बदनामीकारण खोटे आरोप केल्याने त्यांच्यावर कलम ( IPC 499,500,211 ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात यावा, खा . नवनीत राणा यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस यांना बदनाम करण्यासाठी व महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून सद्यपरिस्थितीत दंगली घडविण्याच्या भावनेने शिवसैनिकांचे आदरस्थान असलेल्या ” मातोश्री ” या पक्षप्रमुखांच्या निवासस्थाना समोर गैरकायद्याची गर्दी जमा करून हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिवसैनिकांना हेतुपुरस्कर डिवचण्याचा प्रयत्न केला त्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य वारंवार करुन मुख्यमंत्र्यांना अर्वाच्च शब्दात उल्लेख केला . त्यामुळे त्यांना अटक केली असता खा . नवनीत राणा यांनी मुंबई पोलीसांवर ” मी मागासवर्गीय समाजातून येत असल्याने मला पाणी सुध्दा दिले नाही असा खोटा व जातीयवादाचा आरोप केला व खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला . आज मुंबई पोलीसांनी त्यांच्याकडचे सीसीटीव्ही फुटेज फोटो प्रसिध्द केले असता त्यात खा . नवनीत राणा हे पोलीस स्टेशनमध्ये चहा पाणी घेतांना क्लिपस प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचा खोटेपणा उघड झाल्याने मुंबई पोलीसांची , महाराष्ट्र शासनाच्या बदनामीचे IPC 499,500,211 अन्वये कलम त्यांच्यावर लावण्यात यावे म्हणजे असे प्रकार करुन कोणीही पोलीस दलाची खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न करणार नाही . मुंबई पोलीस हे जगात प्रसिध्द असलेले पोलीस दल आहे त्यांचे असे मिडीयाचा वापर करुन खच्चीकरण करणे अत्यंत घृणास्पद आहे . अशा निच प्रवृत्तींवर वेळीच कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे या वेळी महिला आघाडी व युवतीसेना यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदन वेळी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, छोटू धाकराव, राजाभाऊ धोंडगे, महेंद्र गरुड, सचिन दरगुडे, कृष्णा जगताप, पवन बागुल, कलश पाटेकर, इ शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हा संघटक कल्पना दोंदे ,विद्या सुनील जगताप तालुका अध्यक्ष ,नेहा कृष्णा जगताप,संगीता बागुल,सरला घोंगडे, नाजमा जाफर मिर्झा,कविता कैलास पाटेकर, निता विक्रम लोंढे,नेहा जगताप,पुजा छाजेड़,सपना महाले, स्नेहल जाधव,अंजली सुर्यवंशी, कविता कालसर्पे, ललिता ठोम्बरे, श्रुष्टि देशमुख, कोमल भालेराव, दिक्षा झालटे, मुस्कान शेख,निबरिया वैभवी,नाबरिया वैष्णवी या महिला कार्यकर्त्यांनी मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवावा असे निवेदन देण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here