विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आमिन शेख यांची निवड

0

मनमाड : १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न झाले.या साहित्य संमेलन मध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून मनमाड येथील युवा पत्रकार आमिन नबाब शेख यांच्या नियुक्ती ची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्यचे संघटक कॉ.किशोर ढमाले यांनी केली.अमिन शेख हे मनमाड शहरांतील पत्रकार आहे. फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच,ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व सेंट्रल रेल्वे मजुदर संघ मनमाड चे हितचिंतक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पहिले विद्यार्थी-पालक-शिक्षक साहित्य संमेलन २०२० मध्ये मनमाड येथे भरविण्यात आले होते.त्या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, दैनिक पुण्यनगरी चे मनमाड प्रतिनिधी म्हणून काही काळ काम केले आहे.साप्ताहिक मनमाड सम्राट चे ते संपादक आहे तर ते जागर जनस्थान न्युज चॅनल,E.T.Vभारत न्युज चॅनल प्रतिनिधी,दै.महानगर टाइम्स चे प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहे. परिवर्तन सोशल अकादमी च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मनमाड शहरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here