कासार पिंपळगावच्या प्राथमिक शाळेच्या आवारात समाजकंटकांचा नंगानाच ? पोलिसांनी कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगावच्या प्राथमिक शाळेच्या आवारात गावातील समाजकंटकांनी हैदोस घातला असुन शाळेच्या प्रवेशद्वारा समोर राजरोसपणे तंबाखू, गुटखा, सिगारेट,मावा, दारू,गांजा,चरसा सारखे अंमली पदार्थांचे सेवन करून सरकारी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. गावातील समाजकंटकांनी शाळेच्या आवारातील हा परिसरा म्हणजे समाजकंटकांचा एक अड्डाच बनला आहे. शाळेच्या गेटसमोर एक मंदिर आहे. या मंदिर परिसरात राजरोसपणे गुन्हेगारी प्रव्रुत्तीच्या लोकांनी आश्रय स्थान निर्माण केले आहे.रात्रभर अंमली पदार्थाचे सेवन करून धिंगाणा घालून शाळेच्या परिसरात शांतता भंग केली जात आहे.शाळेसमोर तरुण युवकासाठी माजी आमदार स्व.राजीवराजळे यांच्या नावाने अभ्यासिका केंद्र आहे.दररोज सकाळ-संध्याकाळी विद्यार्थी या केंद्रात अभ्यास करतात.या विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाही या समाजकंटकांचा अतिशय त्रास होत आहे. शाळेच्या आवारातील अंगणवाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून लहान मुलांसाठीच्या साहित्याची चोरीही झालेली आहे. शाळेच्या समोरील ऐश्वर्या स्टेशनरीचे शटर उचकटून झेरॉक्स मशिनचीही चोरी झालेली आहे.अशा अनेक प्रकारच्या खोड्या या समाजकंटका कडून केल्या जात आहेत. या प्राथमिक शाळेत पालक आपले विद्यार्थी पाठवायला घाबरत आहेत. कारण या परिसरात प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण केली जात आहे.शाळा सुटण्याच्या वेळी अनेक पालक आपल्या पाल्यांना नेन्यासाठी शाळेच्या गेटवर जमा होतात त्या वेळी अनेक पालक हा हैदोस प्रत्यक्ष डोळ्यांनी पहात आहेत. पाथर्डी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी विद्यार्थ्यांच्या पालकांनी मागणी केली आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन ,स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here