अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी मुरलीधर नजन यांची निवड

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) संपूर्ण भारतात कार्य क्षेत्र असलेल्या अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी आडगाव ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असलेले मुरलीधर श्रीधर नजन यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.या निवडीच्या पत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी आणि प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निलपवार यांनी सह्या करून नजन यांना २०/४/२०२२ रोजीप्रदान केले आहे.त्याच बरोबर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे. ती पुढील प्रमाणे  अध्यक्ष-मुरलीधर श्रीधर नजन (पाथर्डी),उपाध्यक्ष-स्वप्नील स्वरुपचंद गायकवाड(नेवासा),सचिव-विठ्ठल आदिनाथ गडकर-(राहुरी),कोषाध्यक्ष-पंकज विनायक डहाळे(शेवगाव), महासचिव-अरुण चंपाचंद देवरे(संगमनेर), संयुक्त सचिव-खंडू दशरथ साळवे (पारनेर), संघटन सचिव-साहेबराव केरू भगत(पारनेर), मिडिया प्रभारी-विजयकुमार रोहिदास बजांगे (नेवासा), सोशल मिडिया प्रभारी-महेश चंद्रकांत मडके(श्रीगोंदा), कार्यालय सचिव-सौ. सुनिता अनिल डागा(पाथर्डी),विषेश निमंत्रित सदस्य-रखमाजी सखाराम लेंडे (संगमनेर) याप्रमाणे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याची कार्य कारिणी जाहीर करण्यात आली आहे.या निवडी बद्दल नजन आणि त्यांच्या कार्यकारिणी सदस्याचे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे,व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे चेरमन अप्पासाहेब राजळे,तज्ञसंचालक राहुल राजळे कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी अभिनंदन केले आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here