धुळगावं येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सव सांगता उत्सवात

0

येवला – येवला तालुक्यातील धुळगाव येथे गेल्या वर्षी कोरोना काळात यात्रा महोत्सव साजरा करता न आल्याने सालाबादप्रमाणे यावर्षी खंडेराव महाराज यात्रा मोठ्या संख्येने भाविक भक्त सामील होत पार पडली येथील खंडेराव महाराज जागृत देवस्थान मानले जात असून मिती चैत्र शु ११ या मुहूर्तावर नऊ दिवस नवरदेव घटी बसून खंडेराव महाराजाची पूजा अर्चा. मान मानता करत शेवटचा दिवशी सकाळी नऊ वाजता गंगेवरून भरून आणलेल्या कावडी तसेच मानाची काठी व महिलांनी तुळशी कळस घेऊन वाद्यांचा तालावर गावातून मिरवणूक काढून भाविक भक्तांनी खंडेराव महाराजाच्या नावाचा जयघोष केला तसेच सायंकाळी सहा वाजता घटी बसलेल्या नवरदेवाला या यात्रा महोत्सवाचे गुरुवर्य छबुनाना पवार यांचा आशीर्वादाने व खंडेराव महाराज भक्त मंडळाचे पुजारी श्री किसन लक्ष्मण गायकवाड यांच्या छत्रकृपेने बारा गाड्या ओढणारे मानकरी कैलास कारभारी गायकवाड यांनी खंडेराव महाराज यांचा नऊ दिवस व्रत धारण करून श्रदेने शांततेचा मार्गाने बारा गाड्या ओढत उपस्थित भाविक भक्त यांनी मोठी गर्दी करत भंडाऱ्याची उधळण करीत बारागाडी ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी तालुक्यातून तसेच परिसरातून आलेल्या भाविक भक्तांची महाप्रसादाचा लाभ घेताना एकच गर्दी दिसून आली परंतु सामाजिक कार्यकर्ते व पोलिस पाटील, पोलिस प्रशासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य केले यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू शकले नाही. महणून मोठ्या उत्साहात बारागड्याचा कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाघे मंडळ, पंगतीचे मानकरी भजनी मंडळी, समस्त गावकरी यांनी सहकार्य केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here