खा.नवनीत राणा व रवी राणा यांचा मनमाड रेल्वे स्टेशनवर शिवसैनिकांनी केला निषेध

0

मनमाड: ( प्रतिनिधी निलेश व्यवहारे ) खा.नवनीत राणा आणी रवी राणा त्यांच्या सहकारी सह मुंबई येथे विदर्भ एक्सप्रेस ने रात्री मुंबई कडे जात असल्याचे समजताच मनमाड शहर शिवसेनेने रेल्वे स्टेशन येथे रात्री 2 वाजता जाऊन त्यांचा विदर्भ एक्सप्रेस मध्ये त्यांना शोधले असता रेल्वे पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी शाब्दीक खडाजंगी झाली. यावेळी शिवसैनिकांनी तुफान घोंषणाबाजी केली .”उध्दव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है” वापस जावो, वापस जावो.
आवाज कोणाचा. शिवसेनेचा! अशा घोषणा देत हनुमान चालीसा गायिली.यावेळी भगवे झेंडे घेऊन शिवसैनिकांनी निषेधासाठी स्टेशनवर गर्दी केली होती.यावेळी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, जि.उपप्रमुख संतोषभाऊ बळीद, जि. संघटक राजाभाऊ भाबड, जि.समन्वयक सुनिल भाऊ पाटील, ता.संघटक संजय कटारिया, सुभाष माळवतकर, शहरउपप्रमुख जाफर मिर्झा, छोटू धाकराव, दिनेश घुगे, युवासेनेचे शहराध्यक्ष अमीन पटेल, अंकुश गवळी, ता.संघटक योगेश इमले, आशु पोहाल, सचिन दरगुडे, सिद्धार्थ छाजेड, योगेश शर्मा, आशिष पराशर, संघटक महेंद्र गरुड, कय्याम सैय्यद, वाहतूक सेनेचे अमजद शेख, बंटी आव्हाड, दिपक खैरे, दिपक मौर्य, ऋतिक मंगवाणा, संदिप गिरमकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here