१६ व्या विद्रोही साहित्य संमेलन उदीगर जिल्हा लातुर येथे दि.२३ व २४एप्रिल २०२२ रोजी संपन्न होणार

0

मनमाड : १६ व्या विद्रोही साहित्य संमेलन उदीगर जिल्हा लातुर येथे दि.२३ व २४एप्रिल २०२२ रोजी संपन्न होत आहे.या साहित्य संमेलनचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक गणेश विसपुते व जेष्ठ पत्रकार, पुर्णवेळ कार्यकर्ते अशोकआप्पा परदेशी यांचा मनमाड शहर विद्रोही सांस्कृतिक चळवळ, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड, फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड,सिंटु कामगार संघटना, मनमाड परिवर्तन सोशल अकादमी, मनमाड तर्फे मनमाड येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, जेष्ठ साहित्यिक डॉ.जे.वाय.इंगळे, साहित्यिक डॉ.नितिन जाधव, कामगार नेते कॉ.रामदास पगारे, सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख, डॉ.वर्षा झाल्टे आदी उपस्थित होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार बब्बुभाई शेख हे होते.
यावेळी सिद्धार्थ जोगदंड, रामदास पगारे,फिरोज शेख, सतिश भाऊ केदारे, डॉ.जे.वाय.इंगळे, डॉ.नितिन जाधव, डॉ.वर्षा झाल्टे, आदी चे भाषणे झाली.
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळ, मनमाड, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड,सिंटु कामगार संघटना, मनमाड यांच्या तर्फे गणेश विसपुते व अशोक परदेशी यांचा सत्कार या.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन बागुल यांनी केले तर सुत्रसंचलन शरद झोंबाड यांनी केले तसेच पाहुण्यांची ओळख अमिन नबाब शेख यांनी केली.कवी राजू लहिरे यांच्या कविता वाचनाने कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here