नवी दिल्‍लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट

0

मुंबई 🙁  जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ) चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमीला वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तसेच स्‍वयंरोजगार निर्मीती केंद्राचा दर्जा देण्‍यात यावा अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय सुक्ष्‍म, लघु तथा मध्‍यम उद्योग मंत्री श्री. नारायण राणे यांच्‍याकडे केली. याबाबतचा प्रस्‍ताव तपासून त्‍वरीत सकात्‍मक निर्णय घेण्‍यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले.वरील मागणीच्‍या अनुषंगाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची भेट घेत त्‍यांना निवेदन सादर केले व चर्चा केली. या चर्चेदरम्‍यान आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर येथील वन अकादमीला भारत सरकारच्‍या सुक्ष्‍म, लघु तथा मध्‍यम उद्योग मंत्रालयाची नोडल एजन्‍सी खादी ग्रामोद्योग आयोगाने मल्‍टी डिसिप्‍लीनरी ट्रेनिंग इंस्‍टीटयुट चा दर्जा देण्‍याची शिफारस करण्‍यात आली आहे. खादी ग्रामोद्योगच्‍या विभागीय संचालकाद्वारे वन अकादमीच्‍या उच्‍चतर दर्जाची साधन सुविधा, प्रशिक्षण संसाधने यांचे प्रत्‍यक्ष अवलोकन करण्‍यात आले आहे. देशात वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तथा स्‍वयंरोजगार निर्माण करण्‍यासंदर्भात स्‍वतंत्र संस्‍था अद्याप उपलब्‍ध नाही. चंद्रपूर वन अकादमी विदर्भातील वनव्‍याप्‍त क्षेत्रात स्‍थापित आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमीला वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तसेच स्‍वयंरोजगार निर्मीती केंद्राचा दर्जा देण्‍यात यावा असा प्रस्‍ताव खादी ग्रामोद्योगचे अध्‍यक्ष व संचालकांना सादर करण्‍यात आला आहे. या प्रस्‍तावाला प्राधान्‍याने मंजूरी देण्‍यात यावी, अशी मागणी या चर्चेदरम्‍यान आ. मुनगंटीवार यांनी केली.याबाबतचा प्रस्‍ताव तपासुन त्‍वरीत सकारात्‍मक निर्णय घेण्‍यात येईल असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here