जवखेडे खालसा येथे कानिफनाथ यात्रा महोत्सव संपन्न

0

(सुनिल नजन अहमदनगर) संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जवखेडे खालसा येथे कानिफनाथ यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले जवखेडे खालसा येथील कानिफनाथ मंदिर हे भाविकांचे श्रद्धा स्थान बनले आहे.पैठण येथून आणलेल्या गंगेच्या कावडीने पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे वाजत गाजत जाउन कानिफनाथांचा जलाभिषेक करण्यात आला. रात्री संदल मिरवणूक,आणि छबिन्यातील निशान मिरवणूक व फुलांच्या चादर मिरवणूकीतील शोभेच्या दारुगोळ्याची आतषबाजी हे या यात्रेचे मुख्य आकर्षण होते. तिसगाव-मीरी रस्त्यावरील कानिफनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सौ.स्वाती-अंजना शेवगावकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा गावठाणात भरवण्यात आला होता. व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ यांच्या हस्ते नामवंत मल्लांना बक्षिसे वितरण करण्यात आली. तर सत्यभामा मंडळाच्या वतीने शिवाजीराव वाघ पाटील यांनी कुस्तीत पराजीत झालेल्या प्रत्येक मल्लांना प्रवासासाठी पन्नास-शंभर रुपये देऊन सन्मानाने वाटे लावले.यात्रा कमेटीच्या वतीने शाबुद्दिन भाई शेख,पाथर्डी कोर्टाचे जेष्ठ विधिज्ञ लतिफभाई शेख,अहमदनगर कोर्टातील विधिज्ञ निसारभाई शेख,वैभव आंधळे,सुरेश वाघ,पोपटराव आंधळे,चारुदत्त वाघ,ताजुद्दीन शेख,अनंत वाघ,नुरबाबा शेख,अमोल वाघ,शरद गवळी, ईसाकभाई शेख,राधाकिसन जाधव,कैलास मतकर, अमोल गवळी, अरुण मतकर,मुस्ताकभाई शेख यांच्या हस्ते सर्व पैलवानांना योग्य बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.शेवटी “हेल गुजारा”करीत नगारा वाजवित या यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here