वाघोली सेवा सोसायटीच्या चेरमनपदी”माधव” पँटर्नचे शेषराव आव्हाड सर तर व्हाइस चेरमनपदी सौ. मिराबाई भिमराज शिंदे यांची बिनविरोध निवड !

0

(सुनिल नजन अहमदनगर) संपूर्ण महाराष्ट्रात स्व.ना.गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी (ओबीसी) समाजाचा “माधव”पँटर्न राबवून त्यावेळी भाजप-सेना युतीची सत्ता स्थापन केली होती. त्याच गोष्टींची पुनरावृत्ती अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली सेवा सोसायटीच्या निवडणूकीत दिसुन आली.माधव पँटर्न हा उपक्रम जरी तत्कालीन भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्व.ना.गोपीनाथ मुंडे साहेबांचा होता तरी वाघोलीत सत्ता मात्र माजी आमदार घुले-काकडे गटाकडे कायम राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्र शेखरभाउ घुले आणि जनशक्ती मंचाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे गटाने बाजी मारुन स्व.मारुतराव घुले पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर कायम वर्चस्व प्रस्थापित केले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राष्ट्रवादी का्ँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील गटाचे शेषराव शामराव आव्हाड सर यांची चेरमनपदी आणि जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे गटाच्या सौ.मीराबाई भिमराज शिंदे यांची व्हाइस चेरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह लकवाल यांनी चेरमन,व्हाइस चेरमन पदाच्या निवडी जाहीर केल्या.आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मानही केला.संस्थेचे सचिव बलभीम मोरे यांनी विषेश सहकार्य केले. माजी आमदार चंद्रशेखरभाउ घुले, जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे,जनशक्ती मंचचे शिवाजीराव काकडे,शेवगाव तालुका दुधसंघाचे माजी चेरमन भरतराव वांढेकर, माजी सरपंच सुधाकर आल्हाट, माजी उपसरपंच दिनकर फुंदे,दत्तक्रुपा प्रोड्युसर कंपनीने संस्थापक अशोक दातीर सर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी नुतन संचालक,दिलिप आव्हाड,पांडुरंग दातीर,दिलिप तुतारे,रमेश आव्हाड,विठ्ठल आव्हाड, गंगाधर भालसिंग, अमोल आव्हाड, गंगाधर वांढेकर, रतन आल्हाट, संचालिका सौ.हिराबाई भालसिंग ईत्यादी संचालकांनी सहाय्यक निबंधक दप्तरी सह्या केल्या. यानंतर गोटीराम वांढेकर, नारायण आव्हाड, अर्जुन शिंदे,मोतीराम काळे,आदिनाथ आव्हाड, पांडुरंग कळकुटे, मारुती पांढरे,भगवान दातीर,गोरक्ष जमधडे,गणेश आव्हाड, मल्हारी आव्हाड, हरिभाऊ शेळके,अशोक जमधडे,साहेबराव आंधळे,पांडुरंग नागरे,यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. माधव पँटर्न म्हणजे माळी समाजाचे विरोध पक्षनेते सोपान जमधडे,धनगर समाजाच्या सौ.मिराबाई शिंदे,आणि वंजारी समाजाचे शेषराव आव्हाड सर असा सर्वांचा मिळून “माधव” पँटर्न ची सत्ता वाघोली सोसायटीवर प्रस्थापित करण्यात आली आहे.सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर मंडळाचे बारा उमेदवार निवडून आले होते. तर विरोधी शेतकरी मंडळाचे सोपान जमधडे हे एकमेव उमेदवार निवडून आले होते. निवडणूकी पुर्वी विरोधी गटाला पाच जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. परंतु विरोधी गटास हे मांन्य न झाल्यामुळे ही अतिशय अटी-तटीची निवडणूक शांततेत पार पडली.स्व.मारुतराव घले पाटलांनी घालून दिलेली समानतेच्या शिकवणीची आठवण ठेवून गोरगरीब जनतेची अडवनूक न करता सर्वांना समान न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित चेरमन शेषराव आव्हाड सर यांनी दिली. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here