मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन आणि पत्रकार कॉलनी साठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0

मनमाड : मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने आज पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन पटेल यांना पत्रकारांसाठी पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी साठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी मनमाड शहर पत्रकार संघ मनमाड चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून मनमाड शहरांमध्ये पत्रकारांसाठी पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी अशी मागणी होत असताना याबाबत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल अद्याप पर्यंत न घेतली गेल्याने आज मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन पटेल यांना निवेदन देऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन व शहराच्या हद्दीमध्ये असलेल्या ओपन स्पेस हा पत्रकार कॉलनी साठी देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले सदर निवेदन माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना पाठवण्यात आले असून याबाबत पालिका प्रशासनाने योग्य ती भूमिका घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळेस मनमाड शहर पत्रकार संघाचे आझाद आव्हाड ,जगदीश आडसुळे, हर्षद गद्रे विनोद वर्मा, अविनाश पारखे, सतीश परदेशी ,अमोल बनसोडे, राजेंद्र तळेकर, सागर भावसार, नरहरी उबरे, संतोष खताळ, आनंद निकम ,क्रांती आव्हाड ,तुषार तळेकर, एडवोकेट यतीश देसले, विलास आहिरे, बाळासाहेब अहिरे, हुसेनी टिनवाला आदी उपस्तीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here