वाघोली येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

0

(सुनिल नजन/अहमदनगर) नगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याच्या सिमेवर असलेल्या वाघोली येथे ह.भ.प.सुर्यभान महाराज केसभट आणि रोहिदास महाराज वाघोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८मार्च ते ४ एप्रिल २२या कालावधीत जोडीचे हनुमान मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम वेदशास्त्रसंपन्न विष्णूपंत भालेराव यांच्या विणा व ग्रंथ पुजनाने या सोहळ्यास सुरुवात झाली. या सप्ताह काळात सर्व ह.भ.प. एकनाथ सायकड,सुनील दिवटे,धनंजय ससे,बाबासाहेब गडकर, केसभट महाराज, रोहिदास महाराज, यांची प्रवचने तर सर्व ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री,ज्ञानेश्वर महाराज राउत, योगेश महाराज शिंदे, ज्ञानेश्वर माउली कदम,मारुती महाराज तुणतुणे, शिवाजी महाराज शिंदे,महंत कैलास गीरी महाराज यांची किर्तने होणार आहेत. रविवार दि.३ एप्रिल रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. आणि सोमवार दि.४/४/२२ रोजी सकाळी ९वाजता ह.भ.प. तुकाराम महाराज केसभट यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि महाप्रसादाने या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.व्यासपीठ शरद वाघ,धनंजय ससे हे चालवणार आहेत. आणि पैठणच्या म्रुदुंग महर्षी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी हे या सप्ताहात आपली सेवा सादर करणार आहेत.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन समस्त, ग्रामस्थ, भजनी मंडळ वाघोली ता.शेवगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. वरील सप्ताह काळात दररोज सकाळ – संध्याकाळी दहिवाळकर,शेळके,गाडगे,हंडाळ,जाधव,शिंदे,वांढेकर, कळकुटे,जमधडे, शिंगटे, सरगड,जोगदंड, गव्हाणे,दातीर, केसभट,गवळी मोहचकर या परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. भाविकांनी अन्नदानाच्या पंक्तीचा लाभ घ्यावा असे संयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here