महेश्वर तेटांबे ‘राष्ट्रीय समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित..

0

मुंबई : मुरबाड-कल्याण (प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर)
पत्रकार तसेच सिने-नाट्य दिग्दर्शक महेश्वर भिकाजी तेटांबे यांना स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापनादिना निमित्त , कुणबी समाज हॉल, मुरबाड या ठिकाणी ह.भ. प. निलेश महाराज कोरडे (राष्ट्रीय किर्तनकार समाज प्रबोधनकार) यांच्या हस्ते राष्ट्रीय समाज रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार गौरव शेलार, प्रमोद दळवी, संघांचे सभासद आदी मान्यवर उपस्थित होते. महेश्वर तेटांबे यांच्या उल्लेखनीय कार्याचा उचित गौरव व्हावा त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची वाटचाल वृद्धिंगत व्हावी यां सामाजिक भावनेने तेटांबे यांची पुरस्कारासाठी म्हणुन अचूक निवड केली. तेटांबे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आपल्या पत्रकारीतेबरोबर त्यांनी चित्रपट क्षेत्रांत देखील आपला ठसा उमटविला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. ते स्वतः सिने नाट्य दिग्दर्शक असून त्यांनी आतापर्यंत बऱ्याच वेबसीरीजचे दिग्दर्शन तसेच आस, अर्थ स्वार्थ, शिदोरी, ७७७ रुपयांत बाबा. अशा अनेक लघु चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे. त्यांच्या काही लघु चित्रपटांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पर्जन्यवृष्टीमुळे चिपळूण आणि कोल्हापूर मधील जनता बेघर झाली त्यांना आधार म्हणुन के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल १९८८ दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना दिलेली मदतिची हाक म्हणुन महेश्वर तेटांबे दिग्दर्शित ” देणे मानवतेचे” हा माहितीपट सध्या यूट्यूब वर गाजत आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला तेजस मेघा फिल्म्स प्रस्तुत पहिला मराठी सामाजिक सिनेमा ” फरफट ” हा सध्या ओटीटी फ्लॅटफॉर्म वर गाजत असून लवकरच तो सिनेमागृहात प्रदर्शित होईल. सध्या ते आर्यारवी एंटरटेनमेंट या स्वतःच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत ” पुरस्कार ” या मराठी सिनेमाच्या कामांत व्यस्त असून लवकरच याचे चित्रीकरण सुरू होणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.( धन्यवाद
गुरुनाथ तिरपणकर
पत्रकार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here