एस्.एम्.हायस्कूलच्या १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात संपन्न.

0

मुंबई -कुणकेश्वर(गुरुनाथ तिरपणकर)-१९७६ची दहावीची बॅच,व्हाटसग्रुप आहे,फोनवरून बोलण होत असत,पण प्रत्यक्षात भेट म्हणजे स्वर्गीय आनंदच.तोच अविस्मरणीय क्षण कुणकेश्वरच्या पुण्यभुमीत अनुभवला.आजच्या घडीला माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी केव्हाच आज्जी-आजोबा झालेले आहेत.प्रत्यक्ष मित्र-मैत्रिणींची भेट होताच वय क्षणात कमी झाल,आणि१९७६च्या आठवणींना उजाळा मिळाला.आत्ताच्या घडीला सर्वच मित्र-मैत्रिणी आपआपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेले आहेत.२००९साली३३वर्षांनी एकत्र आलो होतो,परत१२वर्षांनी हा स्नेहमेळ्याचा योग जुळून आला.४६वर्षांचे कणकवली येथील एस्. एम्.हायस्कूलच्या सन १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचे हे अतुट नाते त्यांच्या आत्मविश्वासाने प्रेमबंधनात-स्नेहात टीकुन आहे,हे विशेष.एकत्र आल्यानंतर प्रत्येकाच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली गेली.जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.त्याकाळातील मौज,मजा,मस्ती पुन्हा अनुभवली.माणूस म्हणून जगत असताना हे क्षण विस्मरणात गेले असते तर,आयुष्यात काहीतरी गमावल्यासारख वाटल असत.पण हे अनमोल क्षण अनुभविण्याची संधी दिली ते माजी विद्यार्थी व आमचे उद्योजक मित्र नंदु आळवे आणि संजय पाध्ये यांचे विशेष कौतुक.त्यांनी हा स्नेहमेळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.८मार्च रोजी जागतिक महिला दिन संपन्न झाला,त्याच महिला दिनाचे औचित्य साधत जनजागृती सेवा समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष माजी विद्यर्थ्यींनींचा माजी विद्यार्थी व माजी आमदार राजन तेली व माजी विद्यार्थी माजी जिल्हा परिषद सदस्य सतिश नाडकर्णी यांच्या हस्ते”सन्मानपत्र”प्रदान करुन गौरवांकीत करण्यात आले.स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असतो,घडाळ्याच्या काट्यानुसार कामाचे तास ठरविणा-या लोकांना सग्यासोय-यांकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो,पण या धकाधकीच्या जीवनातही वेळात वेळ काढून एकत्र येऊन सुखदुःखांची देवाणघेवाण करुन चार क्षण आनंदात घालविण्याचा हा पायंडा आदर्शवतच आहे.दोन दिवस संपन्न झालेल्या या स्नेहमेळ्याचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थी भरत तोरसकर यांनी केले.व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थीनी सौ.रजनी चिंचळकर-पाध्ये हिने केले.अशा प्रकारे कणकवलीत एस्.एम्.हायस्कूलच्या सन १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचा स्नेहमेळा कुणकेश्वर स्थळी उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here