
(पैठणच्या वाळवंटातून,सुनिल नजन अहमदनगर) संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पैठणच्या वाळवंटातील नाथ षष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गंगेच्या नदीपात्रातील वाळवंटात वारकऱ्यांनी राहुट्या उभारुन फड निर्माण केले आहेत.व्यापारी वर्गानीही आपली दुकाने थाटली आहेत.वारकरी व भाविक आणि वारकऱ्यांच्या दिंडी फडाने पैठण नगरी दुमदुमून गेली आहे.नाथभक्ता साठी नाथ जलाशयाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी धरणाचे दोन दरवाजे उघडून नदीपात्रात १०० क्युसेसने पाणी सोडले आहे.त्यामुळे वारकरी, नाथभक्त,आणि व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपालिकेने नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्र स्वच्छ केले आहे.तिन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात भजन,किर्तन,प्रवचन,गवळण, भारुड,ई. कार्यक्रम आयोजित करून भाविक भक्ती पंथात लीन झाले आहेत. लाखो वारकरी नदीपात्रात स्नान करून नाथाचे दर्शन घेत आहेत.राज्याचे रोजगार हमी योजनेचे मंत्री ना.संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली नाथ संस्थानचे मुख्य कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांनी नाथ मंदिरात येणाऱ्या भक्तासाठी दर्शन बारीची चोख व्यवस्था ठेवली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने शेवगाव, पाचोड,शहागड, औरंगाबाद,या रस्त्यावरील काट्या काढून खड्डे बुजविले आहेत.पोलीस निरीक्षक कीशोर पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांना नेमून दिलेल्या जागेवर लक्ष केंद्रित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.उर्जा मंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनीही या महोत्सवात महावितरणने विज पुरवठा खंडित करुनये अशा सुचना वीज अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.कोरोणामुळे दोन वर्षे हा सोहळा बंद असल्याने या वर्षी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.भजन किर्तन, भारुडानी गंगेचे वाळवंट दुमदुमून गेले आहे.हिंदू-मुस्लिम ऐक्याच प्रतिक असलेले व भाविकांना समतेचा नारा देणारे भगवे-हिरवे झेंडे श्री गंगेश्वर मंदिर आणि हजरत सिद्ध अली बाबा दरगाह कमानीवर डौलाने फडकत आहेत.हे या सोहळ्याचे खास आकर्षक वैशिष्ट्य आहे. (पैठणच्या वाळवंटातून ) (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)
