नामदार प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री यांच्या विशेष प्रयत्नातुन अतीवृष्टी बाधित शेतकर्यांना अनुदान मंजुर.

0

अहमदनगर : -राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील२१ गावातील माहे आँगस्ट सप्टेबर २०२१ मध्ये झालेल्याअतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या शेतीपिकांचे नुकसानीने बाधित झालेल्या शेतकर्यांना मालमत्ता व शेतीमालाच्या नुकसानीपोटी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासन निधीमधुन शासननिर्णयातील निश्चित केलेल्या वाढीव तरतुदीनुसार आवश्यक निधी मंजुर करण्यात आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव करडवाडी शिरापुर देवराई त्रिभुवनवाडी कौडगाव घाटशिरस कामतशिंगवे कडगाव रेणुकावाडी चिचोंडी डोंगरवाडी राघोहिवरे मांडवे पारेवाडी सोमठाणे खुर्द निंबोडी शिराळ करंजी केशवशिंगवै कोल्हार ह्या २१ गावासाठी एकुण रु. ४३७७२००.०० एवढा मदतनिधी मंजुर करण्यात आला असुन लवकरच बाधित शेतकर्यांच्या बँक खात्यात निधी वर्ग करण्यात येणार आहे.अशी माहिती ना.प्राजक्तदादा तनपुरे यांच्या तिसगाव येथील जनसंपर्क कार्यालया कडून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here