
रायगड: 🔹गिरीष तांबे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या रायगड युवा जिल्हाअध्यक्ष पदी निवड🔹
रायगड(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या रायगड युवा जिल्हा अध्यक्ष पदी गिरीष तांबे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर केली
💐💐💐🎉🎉💪🏻💪🏻संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जोमाने वाटचाल सुरू ठेवली असून तरुण तडफदार युवक मोठ्या प्रमाणाने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे.गिरीष तांबे यांचा रायगड जिल्ह्यात युवकांमध्ये दांडगा जनसंपर्क असून गिरीश तांबे सतत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अग्रेसर असतात रक्तदान शिबिर असो, महामानवांच्या जयंती असो, गोरगरिबांना मदत असो ,आदी कामांमध्ये गिरीश तांबे हे स्वतःला झोकून देऊन काम करतात.गिरीष तांबे यांच्या निवडीने समस्त कामोठे शहर,पनवेल,खारघर,नवी मुंबईत सर्वच ठिकाणी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना सर्वच ठिकाणाहून शुभेच्छा येत आहे व त्यांचे अभिनंदन होत आहे.👉🏻 लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे व युवा नेतृत्व बिपीन कटारे यांचा रायगड जिल्हा दौरा आयोजित करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी परिश्रम घेणार असे बोलतांना गिरीष तांबे यांनी सांगितले.
🎉🎉🎊🎊🎊🎊👉🏻राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने🔹we are republican🔹(आम्ही रिपब्लिकन) समाज जोडो अभीयान संपूर्ण देशात गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे येथील प्रस्थापीत व्यवस्थेने येथील शेवटच्या घटकाचा आवाज बुलंद होऊ दिला नाही त्या सर्व घटकांना एकत्रित करून खऱ्या अर्थाने त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी पक्ष मैदानात उतरला आहे.
