जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जुन्नर तालुका औद्योगिक वसाहत मधील ६० उद्योगांमधील ४००+ महिला कामगार माता-भगिनींना बेनके कुटुंबाच्या वतीने भेटवस्तू वाटप करून सन्मानित करण्यात आले.

0

पुणे : ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊ माँ साहेब,स्रियांना शिक्षणाची दारे उघडे करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,”मेरी झाशी में नही दुनगी” असा इंग्रजांविरोधात नारा देणाऱ्या झाशीची राणी ह्या महिला आपल्यासाठी आदर्शवत होत्या,त्यांचे विचार आपण जोपासले पाहिजे.कुटुंब घडवत असताना मुलांवर संस्कार असो किंवा यशस्वी पुरुषाच्या पाठीमाघे असणारा हात असो हे फक्त कुटुंबातील सक्षम स्त्री करू शकते.आज विविध क्षेत्रात महिला नेतृत्व करतात,अन्याया विरुद्ध लढा देतात,आपले कर्तृत्व सिद्ध करतात ही आजच्या युगातील खुप मोठी गोष्ट आहे.८ मार्च हा दिवस महिलांच्या प्रेमाचा,आदराचा दिवस आहे म्हणून आम्ही त्यांच्या प्रति असलेले संबंध जोपासण्यासाठी त्यांचा सन्मान करत आहोत असं *उद्योजिका सौ.धनश्रीताई अमित बेनके* ह्यांनी म्हटले.
जुन्नर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील महिला ही आपली माता-भगिनीच आहे ह्या नात्यातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी,त्यांना येणाऱ्या समस्यांसाठी,सुरक्षिततेसाठी आमदार अतुलदादा बेनके,युवा नेते अमितदादा बेनके* व बेनके कुटुंब सदैव कार्यरत आहे.ह्या कार्यक्रमासाठी प्रतिभा टाकळकर,रंजना लेंडे,ऋचा कुलकर्णी,मंगल दाते,स्वाती टाकळकर काशीद,चारूलता भेके,पटाडे,पडवळ,घोगरे,नायकोडी ह्यांची उपस्थिती होती.उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त करत दरवर्षी हा उपक्रम नित्यनियमाने चालू असल्याने आभार मानले. : औद्योगिक वसाहत कांदळी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here