स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे पक्षप्रमुख आद. मनोजभाई संसारे यांच्या वतीने “8 मार्च” जागतिक महिला दिनाचे आयोजन

0

मनमाड : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे पक्षप्रमुख आद. मनोजभाई संसारे यांच्या वतीने “8 मार्च” जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंडियन कॅन्सर सोसायटी, परेल मुंबई च्या तज्ञ डॉक्टरांचे कॅन्सर शिबिर नितेश उर्फ टक्कूभाऊ संसारे खुले रंगमंच, महात्मा फुले वाडी, वडाळा पूर्व येथे सकाळी 9 ते साय 5 वाजेपर्यंत आयोजित केले होते.सदरील आरोग्य शिबीरास स्वारिप महिला आघाडीच्या मान. आद.श्रीमती मीराताई संसारे, जयश्रीताई सोनवणे, विमलताई कदम, शोभा चव्हाण, जयश्री गडकर, प्रियंका संसारे, दीपा बांदकर,बहिरताई, सुमंगल कांबळे, कुंदाताई केदारे, संगीता घाडगे, सुमन ताई कांबळे, सुनंदा कटारे, रहिमा सिद्दिकी, सविता सोनवणे, खैरूनिशा शेख, मोहिते ताई, संगीता पवार, सरिता तांबे तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय अमित हिरवे, विजय पवार, युवा अध्यक्ष सागर संसारे, सुमित संसारे, आद. उत्तम जाधव गुरुजी, सुरेश रणदिवे, राहुल सातपुते, द. म.मुंबई अध्यक्ष दिनेश जाधव, निलेश कदम, नरेश कांबळे,सुनील कांबळेआदी पदाधिकारी उपस्थित होते.सर्व आदर.मिराताई संसारे व महिला आघाडी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते सर्व कॅन्सर रुग्णालय समूहाच्या डॉक्टर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सदर शिबिराची भोजन व्यवस्था मुंबई अध्यक्ष अमित हिरवे यांनी सांभाळली.🙏🏼🙏🏼🙏🏼🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🏼🙏🏼🙏🏼

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here