महिलांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारे Koo App चे प्रेरणादायी अभियान

0

राष्ट्रीय : रोजच्या आयुष्यातल्या सामान्य महिलांचा संघर्ष ठळक करत हे प्रेरणादायी अभियान लैंगिक धारणांना को तोडत महिलांमधल्या मुक्त चर्चांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेला अधोरेखित करते.

राष्ट्रीय, 8 मार्च 2022: प्रादेशिक भाषांमधला अभिव्यक्तीचा सर्वात मोठा मंच Koo App ने #BejhijhakBol नावाचे एक अनोखे अभियान व्हीडियोच्या माध्यमातून सुरू केले आहे. कुठल्याही भय वा संकोचाशिवाय महिलांनी अभिव्यक्त व्हावे यासाठी हे अभियान प्रेरित करते. यात जीवनाच्या सर्व क्षेत्रातील महिलांनी गाजवलेल्या कर्तृत्वाची झलक दाखवलेली आहे. ही झलक अभिव्यक्तीच्या माध्यमातून भावनांना बोलते करण्याची गरज ठळक करते. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 च्या दिवसाच्या औचित्याने सुरू केलेले हे अभियान या वर्षाची थीम- ‘एका सुरक्षित उद्यासाठी लिंगभाव समानता’ची थीम पुढे आणते. मुक्त अभिव्यक्तीला सक्षम करत एकमेकांशी जोडलेल्या दुनियेत लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या गरजेला अधोरेखित करते.Koo App ची मूळ प्रतिज्ञा भाषेवर आधारलेली आत्म-अभिव्यक्ती आहे. जिला एका नव्या स्तरावर घेऊन जाताना हे अभियान ‘आणखी मनात जे काही असेल, ‘कू’वर नि:संकोच बोल’, टॅगलाइनच्या माध्यमातून महिलांना संकोच दूर करत उत्साही चर्चांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करते. हे अभियान Koo App चेही प्रतिनिधित्व करते. ते सांगते, की डिजिटल दुनियेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खात्री करण्यासाठी भाषेप्रमाणेच लैंगिक अडथळेही दूर करण्याची गरज आहे. Koo App बनवण्यामागचा हेतूच होता, की मूळ भाषेच्या अभिव्यक्तिला ऑनलाइन सक्षम करून हरेक भारतीयाला सशक्त बनवणे. हा व्हीडियो याच भावनेचे प्रतिबिंब आहे. यात शहरं, संस्कृती आणि सामाजिकचेचे वैविध्य असलेल्या सामान्य महिला (सेलिब्रिटी नाही) आपल्या रोजच्या आयुष्याबाबत बोलताना दिसतात. आणि या महिला अभिव्यक्तीची ताकद असलेल्या सशक्त व्यक्ती आहेत.सर्वसमावेशकता अर्थातच सर्वांना एकत्र आणणाऱ्या एका सुरक्षित, विश्वसनीय मंचाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या रुपात कू ॲप महिला यूजर्सच्या सक्रिय सहभागाची साक्ष देते. ‘कू’वर आपली लैंगिक ओळख सांगणाऱ्यांपैकी जवळपास 40 टक्के यूजर्स महिला आहेत. डॉक्टर, वकील, नोकरदार, उद्योजक, ॲथलिट्स, राजकीय नेते, अभिनेते, लेखक, कवी आणि गृहिणींसह महिला सध्या मंचावर उपलब्ध 10 भाषांमध्ये आपल्या आवडत्या हरेक विषयावर बिनधास्त व्यक्त होतात. यासोबतच कू ॲपवरच्या व्हेरिफाइड लोगोसह त्यांना जवळच्या वाटणाऱ्या विचारधारेच्या लोकांशी विधायक मुक्तचर्चाही करतात. अशावेळी #बेझिझक बोल हे सोशल मीडियाशी जोडून घेतलेल्या वा दूर असलेल्या हरेक महिलेसाठी एक निमंत्रण आहे. ते असे, की कू अॅपसारख्या मंचावर आपल्या मूळ भाषेत स्वत:ला व्यक्त करा आणि इतरांसोबत जोडून घ्या.यासंदर्भात ‘कू’चे प्रवक्ता म्हणाले, “कू ॲप अशा लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करते, जे खुल्या इंटरनेट जगतात अपले विचार आणि मतं शेअर करू इच्छितात. बहुभाषिक इंटरफेसला सक्षम करून भाषेचे अडथळे दूर करण्यासह त्या महिलांना सशक्त बनवतो ज्या इंटरनेटच्या जगात अभिव्यक्तीची गोष्ट आली, की हरप्रकारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. #BejhijhakBol अधिकाधिक महिलांना सोशल मीडियाची ताकद वापरण्यासाठी प्रेरित करेल जेणेकरून त्या त्यांचे विचार एकदम खुलेपणाने आणि हव्या त्या भाषेत शेअर करू शकतील. डिजिटल रूपातल्या बदलत्या दुनियेत भाषिक आणि लिंगभावविषयक अडथळे असता कामा नये. आम्ही नेहमीच आमच्या मंचाला लोकांच्या डिजीटल जीवनाचे एक अभिन्न अंग बनवतो आणि म्हणूनच हे अभियान ‘कू’ चा प्रवास वेगवान करण्यात मदत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here