आमठाणा येथील मराठवाडा पब्लिक स्कूल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील मराठवाडा पब्लिक स्कूल येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभातफेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले .
सरस्वती,माॅसाहेब जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले .कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती डाॅ.कल्पना जामकर, सरपंच कोकीळाबाई मोरे,उपसरपंच विमलबाई लोखंडे,पोलिस शिपाई मनिषा घुले मॅडम,परिचारिका मनिषा काकडे ,डाॅ.वेदिका मेवाळ ,पोस्टमन नेहा खंडेलवाल यांची उपस्थिती होती.याप्रसंगी समाजातील विविध कर्तृत्ववान स्त्रियांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनीनी परिधान करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
परिचारिका मनिषा काकडे,डाॅ. वेदिका मेवाळ,पोस्टमन नेहा खंडेलवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पुरूषांनी स्त्रियांचा सन्मान करण्याअगोदर स्रियांनीच स्त्रीचा सन्मान करावा तरच खर्या अर्थाने हा जागतिक स्त्रीदिन साजरा झाला असे म्हणता येईल ,असे त्या म्हणाल्या ,आज सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रिया आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे ,आपण आहे त्या क्षेत्रामध्ये जीव ओतून काम केल्यास लौकीक झाल्याशिवाय राहत नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषा कुंटे यांनी केले तर सुत्रसंचालन शिवकन्या गायकवाड, सुचिता जाधव यांनी केले ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद रविंद्र राठोड,संदीप राकडे,दिपक गायकवाड, प्रविण गवते तसेच भानुदास झोंड आदिनी परिश्रम घेतले ,आभार प्रदर्शन चैताली बोर्डे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here