मनमाड़ केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना येथील सहाय्यक सामग्री प्रबंधक भारती मुर्ती यांचा सत्कार

0

मनमाड : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोशियशन कारखाना अतिरिक्त मंडलच्या वतीने मनमाड़ केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना येथील सहाय्यक सामग्री प्रबंधक भारती मुर्ती यांचा सत्कार करण्यात आला. भारती मूर्ती या केंद्रीय इंजिनीरिंग कारख़ाना येथील स्टोर डेपो येथे प्रथमतः नियुक्त महिला अधिकारी आहेत.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम,डेपो सामुग्री अधिक्षक भास्कर कळंबे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते सहाय्यक सामग्री प्रबंधक श्रीमती भारती मुर्ती यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, उपाध्यक्ष सुभाष जगताप, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, किरण आहीरे, किरण वाघ, सागर गरूड,शरद झोंबाड, हर्षद सुर्यवंशी, कल्याण धिवर, दिपक वैरागर, प्रशांत मोरे, विनोद खरे, अर्जुन बागुल, राजेंद्र सोनवणे, विशाल त्रिभुवन,सचिन गरुड,जयंत जगताप, सचिन सोनवणे, संतोष गायकवाड, सुमित अहिरे,बाळू चंदन,देवचंद माळी, उत्तम पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here