मनमाड सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे HAK हायस्कुल, ईकरा उर्दू गल्स हायस्कुल,व शहेजादि इंग्लिश मेडीयम स्कूल येथे निबंधस्पर्धेचे पारितोषिक वितरण

0

मनमाड:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनमाड शहरात सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे,मनमाड शहरातील अल्पसंख्यानक मुलीं मध्ये छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत HAK हायस्कुल उर्दू मिडीयम चे 23 तर मराठी मिडीयम 22 तसेच ईकरा उर्दू गल्स हायस्कुल 09,तर शहजादी इंग्लिश मिडीयम स्कुल चे 26 विद्यार्थींनी असे एकूण 80 अल्पसंख्यानक विद्यार्थींनी ने छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध स्पर्धेत भाग घेतला होता,या स्पर्धेत प्रथम क्रमांक – जवेरीया अमजद शेख HAK हायस्कूल व ज्यू. काॅलेज. यांना तर व्दितीय क्रमांक-गौसिया कमरोद्दीन शेख HAK हायस्कूल व ज्यू. काॅलेज. तृतीय क्रमांक – शफाक जहीर अब्बास ईकरा उर्दू गल्स हायस्कूल चतुर्थ क्रमांक – अझरा अयाज बेग शहेजादी इंग्लिश मेडीयम स्कूल. यांना सार्वजनिक शिवजयंती उसत्व समितीचे अध्यक्ष कयाम भाई सैय्यद व संतोष भाऊ बळीद, नगरसेवक मयूर भाऊ बोरसे यांच्या हस्ते पारितोषिक (ट्रॉफी) व भेटवस्तू देण्यात आले,या वेळी HAK हायस्कुल शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सार्वजनिक शिवजयंती उसत्व समितीचे सर्व मान्यवरांचे पुष्पदेऊन सत्कार करण्यात आले, या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भाऊ बळीद,शिवसेना शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, सा. शिवजयंती समितीचे अध्यक्ष कयाम सैय्यद, महेंद्र गरुड, प्रविण धाकरव,पिंटूभाऊ वाघ ,भैय्या घुगे, अमजद मिर्झा, सोनू पोहाल,कादिर शेख सोहेल जाफरी,सद्दाम अत्तार
तर एच ए के हायस्कूल मध्ये मुख्यध्यापक शेवाळे सर, निकम सर, सैय्यद सर, ईकरा गर्ल्स हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक अफजल सर व शहेजादि इंग्लिश मिडियम मध्ये मुख्याध्यापक जमील सर, शहजादी इंग्लिश स्कुलचे संचालक गालिब भाई व सर्व शिक्षकवृंद , पालक उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here