भारतीय नागरिकांचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी विमानतळावर जाऊन स्वागत केले

0

दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ.भारती प्रविण पवार यांच्याकडून सलग दुसऱ्या दिवशी युक्रेन येथून आलेल्या प्रवाशांचे स्वागत युक्रेन रशिया मध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगात भारतीय नागरिक विशेषतः विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही विशेष मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत गो फर्स्ट कंपनीच्या विमानाने दिल्लीमध्ये आलेल्या भारतीय नागरिकांचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी विमानतळावर जाऊन स्वागत केले यावेळी त्यांनी करुणा नियमाचे काटेकोरपणे पालन करून इतरांनाही पालन करण्याच्या सूचना दिल्या डॉक्टर पवार यांनी आलेल्या प्रवाशाला नमस्ते वेलकम इंडिया म्हणून त्याचे स्वागत केले विशेषता विद्यार्थिनी आणि महिलांची त्यांनी आपुलकीने चौकशी करून झालेल्या त्रासाबद्दल माहिती घेतली आणि धीर दिला तसेच ज्या प्रवाशांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज होता त्यांना मुद्दाम थांबवून त्यांनी त्यांच्याबरोबर छायाचित्र घेतली हा ध्वज आपली शान आहे अशी जाणीव त्यांनी त्यांना करून दिली तसेच एका प्रवाशाकडे श्वान असल्याचे पाहिल्यावर त्यांनी मुद्दाम थांबून त्याची देखील चौकशी केली तसेच प्रवासी कोणत्या राज्यातील आहेत याची माहिती घेऊन बंगाली आणि केरळी प्रवाशांशी त्यांच्या भाषेत बोलून डॉक्टर पवार यांनी त्यांचे स्वागत केले तसेच मराठी विद्यार्थी मराठी भाषिक प्रवाशांशी डॉक्टर पवार यांनी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हे युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत आणि सर्वांची सुटका होण्यासाठी प्रयत्न चालू राहतील असा धीरज यांनी यावेळी बोलताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here