माळवाडी, फु.माळवाडी व सरस्वती वाडी या गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश झाल्याने पाणी प्रश्न मार्गी लागणार-जि.प.सदस्या डॉ.नूतन आहेर

0

नाशिक: ( प्रशांत गिरासे वासोळ)
देवळा-(दि.२८ फेब्रुवारी) जिल्हा परिषदेच्या आज ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सर्वसाधारण बैठकीत माळवाडी, फुले माळवाडी व सरस्वती वाडी या तीनही गावांना नऊ गाव पाणीपुरवठा योजनेतून वगळून त्यांचा जलजीवन मिशन या योजनेत समावेश करण्यात आला, सदर योजनेत समावेश झाल्याने गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहे, गावांतील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती केलेल्या पाठपुराव्यास यश आले व जल जीवन मिशन या योजनेत वरील गावांचा समावेश झाला असल्याची माहिती डॉ.नुतन आहेर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here