महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र घोटन येथिल मल्लिकार्जुनेश्वर मंदिर परीसरात विविध उपक्रम साजरे

0

अहमदनगर :  (अहमदनगर प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र घोटन येथील मल्लिकार्जुनेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.ह.भ.प. विक्रम पुरी महाराज यांच्या रसाळ वाणीतून शिवपुराण कथा, दररोज सकाळी मंदिरात शिवलिलाम्रुत वाचन, ह.भ.प.धर्मनाथ महाराज फुंदे यांचे किर्तना नंतर,एक टण खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले.आणि सायंकाळी अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा,पंचरत्न हरिपाठ, रात्रीची महाआरती ई.उपक्रम राबविण्यात आले.हे पांडवकालीन मंदिर असुन महाभारतातील अर्जुनाने या ठिकाणी गायासाठी गोठे बांधले होते म्हणून या गावास “घोटन”हे नाव पडले आहे. पैलवानांचे माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची स्वतंत्र ओळख निर्मान झालीआहे.सर्व जाती धर्माचे लोक जात पात ,राजकीय गट-तट बाजूला ठेवून एकत्र येऊन ही मल्लिकार्जुनेश्वराची यात्रा महाशिवरात्रीला साजरी करतात.अक्षदिप मंडप डेकोरेशनने मंदिरावर आकर्षक रोशनाई केली होती.हे मंदिर पुरातत्व खात्याने ताब्यात घेतले असले तरीही जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here