मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी साजरी

0

मनमाड : स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने नांदगाव तालुक्याचे आमदार मा. सुहासअण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना संपर्क कार्यालय येथे साजरी करण्यात आली.
यानिमित्त आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मौलाना अबुल कलाम आझाद यांना आदरांजली वाहिली. यावेळेस आमदार सुहासअण्णा कांदे,शिवसेना शहरप्रमुख मयुरभाऊ बोरसे, राजाभाऊ भाबड, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती चे अध्यक्ष कयामभाई सैय्यद, योगेश इमले, जाफर मिर्झा, अमीमभाई पटेल गोटू केकाण, इरफानभाई मोमीन, पिंटूभाऊ वाघ, अज्जू शेख,नीतीन सानप,निशांत पाटील,ललित रसाळ,मच्छिन्द्र सांगळे,लोकेश साबळे,सचिन दरगुडे व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here