मराठा समाजाचे भूषण छत्रपती संभाजी राजे यांचे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरु

0

मनमाड : ( प्रतिनिधी – सागर भावसार) सकल मराठा समाजाच्या विविध मागण्याकरिता मराठा समाजाचे भूषण छत्रपती संभाजी राजे यांनी आझाद मैदान मुंबई येथे दिनांक २६।२।२०२२ पासून आमरण उपोषण सुरु केलेले आहे . यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे , सारथी संस्थांचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात व्हावे , आण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोष निधी उपलब्ध करून द्यावा , मराठा समाजाच्या मोर्चात जे गुन्हे दाखल झाले आहेत ते त्वरीत मागे घ्यावे , तसेच मराठा समाजाच्या आंदोलनात जे मराठा बांधव शहिद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबातील १ व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावुन घेण्यात यावे , या प्रमुख व इतर मागण्या करिता मुबंई येथे जे आमरण उपोषण सुरु केले आहे . त्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मनमाड शहरातील जे मराठा समाज बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना मनमाड शहर सकल मराठा समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा देत आहोत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here