पोलिओ दिनानिमित्त ब्राह्मणगाव येथे बालकांना पोलिओचे डोस देऊन सरपंच, उपसरपंच व जेष्ठ ग्रा.प सदस्य यांच्या हस्ते पोलिओ डोस कॅम्पस अभियानाची सुरुवात

0

मालेगाव : आज 27 फेब्रुवारी 2022 रोजी पोलिओ दिनानिमित्त ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस ब्राह्मणगाव ग्रामपालिका चे सरपंच श्री. किरण अहिरे,उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे,जेष्ठ नेते व ग्रामपालिकेचे जेष्ठ सदस्य श्री. अरूण दादा अहिरे,आरोग्य सेविका श्रीमती मनाली हिरे यांच्या हस्ते देण्यात येऊन पोलिओ डोस कॅम्पस अभियानाची सुरुवात करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र,ब्राह्मणगाव च्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित गायकवाड, डॉ.राहुल कांबळे व त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यातर्फे ब्राह्मणगाव येथील वाड्या वस्तीनवर आज पोलिओ डोस बालकांना देण्यासाठीकॅम्पस चे आयोजन करण्यात आले आहे.
या पोलिओ डोस कॅम्पस अभियान उदघाटन कार्यक्रम प्रसंगी सरपंच श्री.किरण अहिरे, उपसरपंच श्री.बापुराज खरे,जेष्ठ ग्रामपालिका सदस्य श्री.अरुण अहिरे,श्री.केदा ढेपले, आरोग्य सेवक श्री.देवरे नाना,श्री.जेजुरकर नाना,श्री.समाधान मोरे,आरोग्य सेविका श्रीमती मनाली हिरे,सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तात्रेय खरे,सुनीलकुमार खरे,श्री.रमेश व्यापार,तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here