मराठी भाषा गौरव दिन सोहळा

0

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय धुरु हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दादर सार्वजनिक वाचनालय धुरु हॉल ट्रस्टच्या सहकार्यान *कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस* दरवर्षीप्रमाणे *शनिवार दि २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा काशिनाथ धुरु हॉल, छबिलदास गल्ली, दादर -पश्चिम, मुंबई २८* येथे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास *ज्येष्ठ चित्रपट-नाटय अभिनेत्री चिन्मयी सुमित, शिवसेना आरोग्य कक्षप्रमुख मंगेश चिवटे, मराठी अभ्यास केंद्राचे प्रा डॉ दीपक पवार, उद्योजक आणि मराठी भाषाप्रेमी उद्योजक मा प्रमोद घोसाळकर* हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी पत्रकाद्वारे घोषित केले आहे.या कार्यक्रमात *ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मा श्री दत्ताराम गवस आणि मा श्री श्रीराम मांडवकर* यांना वृत्तपत्र लेखन चळवळीत योगदान दिल्याबद्दल *जीवन गौरव पुरस्कार* प्रदान करण्यात येणार आहे. तर सौ अश्विनी प्र फाटक यांना *स्व दत्ता कामथे स्मृती ग्रंथालय चळवळीतील सेवाभावी ग्रंथसेविका* या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या निमित्ताने दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ
मराठी भाषाप्रेमींसाठी “मराठी माणसाची भाषिक जबाबदारी” या विषयावर १००० शब्दमर्यादा
असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्याचे परीक्षक जेष्ठ वृत्तपत्र लेखक अनंत आंगचेकर होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तसेच या विषयावर तरुण भारत नागपूरचे मुख्य संपादक मा गजानन निमदेव हे *मराठी माणसाची भाषिक जबाबदारी* या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.मराठी साहित्य प्रेमी आणि वृत्तपत्र लेखक, दिवाळी अंक संपादक, साहित्यिकांनी अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, श्रीमती शुभा दत्ता कामथे, ऍड देवदत्त लाड करीत आहेत.मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
४६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल घोषित मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने ४६ वे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अंक म्हणून मनोरंजनकार का. र. मित्र स्मृती पुरस्कारासाठी “तरुण भारत नागपूर (संपादक-गजानन निमदेव )” याची निवड करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. स्पर्धेचा संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे आहे –
‘मनोरंजनकार’ का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – तरुण भारत नागपूर (संपादक-गजानन निमदेव ), पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक – प्रसाद (पुणे ), पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक – सकाळ अवतरण- पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – ऋतुरंग (मुंबई), साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक – चिकू पीकू (पुणे ), मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक – आनंद तरंग ( पुणे) ,
चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक – पुढारी दीपस्तंभ (कोल्हापूर ),
कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक –  ऋतुपर्ण (पुणे), याशिवाय ग्राहकहित (पुणे), सृजनदीप (हडपसर), कीर्तिवंत (मुंबई),अक्षरदान (पुणे),   वारसा (अहमदनगर), साहित्य संस्कृती (मुंबई), उद्याचा मराठवाडा (नांदेड), साहित्य आभा (अलिबाग),
झुंज (पुणे) सह्याचल (परभणी), सृजनसंवाद (ठाणे), समास (गोवा पणजी), ईरा (नाशिक), एक संक्रमण (वसई), संगम (संगमनेर),निशांत (अहमदनगर), मनोकल्प (पुणे), नवरंग रुपेरी (औरंगाबाद)
विशेष पुरस्कार – स्पर्शज्ञान (स्वागत थोरात ) मुंबई यांची उत्कृष्ट अंक म्हणून निवड केली आहे. परीक्षक – सुनील सुर्वे (ग्रंथालय प्रमुख – केळकर कॉलेज),  दत्ता मालप (प्रत्युष जाहिरात कंपनीचे प्रमुख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here