महिलांची शारीरीक व आर्थिक फसवणुक करणारा भोंदुबाब नाशिक ग्रामीण पोलीसांच्या जाळयात

0

येवला : येवला येथे राहणारी एका २५ वर्षीय मुलीचे लग्न जमत नसल्याने तिचेवर जादुटोणा झाला आहे . त्यावर तोडगा काढावा लागेल नाहीतर लग्न होणार नाही असे निमित्त सांगुन मुलीला मंत्र मारलेले पाणी पिण्यास देवुन चाकुचा धाक दाखवुन मुलीचे शारीरीक शोषण केले . सदर घटनेची आरोपी यांने मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग व फोटो काढुन सदर फोटो व व्हिडीओ शुटींगच्या भिती दाखवुन सदर  मुलगी व तिच्या घरातील तिचे आई व बहिण यांचे शारीरीक शोषण करून त्यांना वेळोवेळी पैशाची मागणी करून त्यांची शारीरीक व आर्थिक फसवणुक करण्या – या येवला येथील भोंदु बाबा बाबत घटना समोर येताच मा . पोलीस अधिक्षक , नाशिक ग्रामीण श्री सचिन पाटील यांनी सदर घटनेची तात्काळ दखल घेवुन भोंदुबाबा यांचेवर तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना दिले . मा . पोलीस अधीक्षक , नाशिक ग्रामीण यांचे सुचनाप्रमाणे येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तात्काळ पोलीस पथकाची नेमणुक करून आरोपी नामे १ ) सुफि अब्दुल अजिज बाबा ( भोंदुबाब ) व २ ) ऍडव्हकेट जब्बार रज्जाक शेख , दोन्ही राहणार जिनींग मिलजवळ , नागडे ता . येवला जि.नाशिक यांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले . भोंदुबाबा व त्याचा जोडीदार या दोघांवर येवला शहर पोलीस ठाण्यास गु.र.नं. ६४ / २०२२ भा.द.वि कलम ३७६ ( २ ) ( जे ) ( एन ) , ३७७ , ३२८ , ३८८ , १२० ब सह कलम पोक्सो अॅक्ट ४,६ , ११ , १२ व सह कलम जादुटोणा अॅक्ट कलम ३ प्रमाणे गुन्हा केला आहे . सदर गुन्हातील भोंदुबाब व त्याचा साथीदार यांना अटक करण्यात आली आहे .  मा . पोलीस अधीक्षक , नाशिक ग्रामीण श्री . सचिन पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे गुन्हाचा पुढील तपास करीत आहे . सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे , सहा . पोलीस निरीक्षक नितिन खंडागळे , पोउनि सुरज मेढे , पोहवा राकेश होलगडे , प्रशांत पाटील , विश्वनाथ काकड , पोना मधुकर गेटे , माणिक टिळे , पोकॉ तौसीब शेख हे सामिल होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here