हनुमान टाकळी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी समर्थ हनुमान शेतकरी पँनल विजयी

0

अहमदनगर : हनुमान टाकळी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी समर्थ हनुमान शेतकरी पँनल विजयी, विरोधकांचा झीरो बजेटवर दणदणीत पराभव ? (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी समर्थ हनुमान शेतकरी विकास पँनलच्या सर्वच्या सर्व १३ जागा निवडून येवून विरोधकांना सपशेल पराभवाला सामोरे जावे लागले.अनुसूचित जाती मधून साहेबराव गोपीनाथ नवगीरे यांना सर्वाधिक (४३०मते)मिळाली.विमुक्त जाती मधून संजय रामभाऊ डमाळ यांना(४१६मते),सर्व साधारण मतदारसंघातून विद्यमान चेरमन अशोक नारायण काजळे यांना(४१४मते),ईतर मागासवर्गीय मतदार संघातून प्रदीप मारूती दळवी यांना(४११मते),सर्व साधारण मधून चेरमन पदाचे प्रबळ दावेदार सुभाष रभाजी बर्डे यांना(४०७मते), महिला राखीव मधून सौ. वंदना अण्णासाहेब बर्डे यांना(४०६मते), श्रीमती चंद्रभागाबाई बापुराव आव्हाड यांना(३९७मते),सर्व साधारण मधून अशोक दगडू बर्डे यांना(३८६ मते),सर्व साधारण मधून संतोष प्रभाकर बावणे यांना(३६६ मते),सर्वसाधारण मधून श्रीराम सिताराम बर्डे यांना(३६४मते),सर्व साधारण मधून संजय आंबादास बर्डे यांना (३५२ मते),सर्व साधारण मधून भाउसाहेब मळूपाटील उघडे यांना(३५२मते),सर्व साधारण मधून रमेश घमाजी मुळे यांना(३४२मते) मिळाली समर्थ हनुमान पँनलचे नेतृत्व व्रुदेश्वर साखर कारखान्याचे संचालक कुशिनाथ बर्डे,ख.वि.सं.चे संचालक सुभाष बर्डे,विद्यमान चेरमन अशोक काजळे,युवा नेते भाउसाहेब उघडे हे करीत होते. विरोधी पक्षाचे नेतृत्व अण्णा दगडखैर आणि माजी चेरमन बाबासाहेब बर्डे हे करीत होते. पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे- मनिषा आंधळे(२४६), रामनाथ खेडकर(२४५), जगन्नाथ दगडखैर(२५५), विठ्ठल दगडखैर(२६०), अशोक मारूती बर्डे(२६०), बाबासाहेब बर्डे(२८८),शहाराम बलफे(२६३),भरत मोरे(२५५),सुलोचना दगडखैर(२७५), सुभद्रा बर्डे(२५८),सुरेश निकाळजे(२५१), बाबासाहेब कोंडिबा बर्डे(२६८),संभाजी दगडखैर(२६५), अपक्ष उमेदवार मेजर गंगाधर बर्डे (७४)मते मिळाली.विरोधकांना पाच जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते पण विरोधकांनी ते धुडकावून लावले.एकूण झालेल्या ६८८ मतदाना पैकी ५४ मते बाद झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नरसिंग पूरकर साहेब यांनी काम पाहिले. सहाय्यक फौजदार पवारसाहेब आणि पो.काँ. श्रीमती साठे मँडम यांनी चोख बंदोबस्त ठेवला.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here