जि.प. सदस्या डॉ. नूतन आहेर यांच्या हस्ते वाखारी पिंपळेश्वर व भावडे येथे प्रा. शाळा वर्ग खोलीचे लोकार्पण

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ) वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतनताई सुनील आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून वाखारी पिंपळेश्वर येथील प्राथमिक शाळेच्या व भावडे येथील शाळेच्या नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती चे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील गोटू आबा आहेर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव उपस्थित होते, सदर कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालकांनी नवीन वर्गखोली झाल्याने समाधान व्यक्त केले यावेळी माजी सभापती सिंधुबाई पवार, सरपंच राहुल पवार, उपसरपंच डॉ.संजय शिरसाट, माजी सरपंच शिवाजी मोरे, ग्रा.पं. सदस्य नितीन ठाकरे, एकनाथ महाराज, रमेश खरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिक शिरसाट, बाबुराव माळी, केंद्रप्रमुख बैरागी, साहेबराव पवार, तानाजी आहेर, विजय मोरे, रमेश भदाणे, संजय शिरसाट, पप्पू पवार, पोपट पवार, लखन जगदाळे, राजेंद्र मोरे, गणेश मोरे, मुख्याध्यापक वाघ, शिक्षक शरद जाधव, सोनाली सूर्यवंशी उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षक अनिल सावंत व मुख्याध्यापक अर्चना आहेर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here