सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मनमाड २०२२

0

मनमाड : शिवजयंती उत्सव समिती २०२२ ची बैठक शिवसेना आमदार मा.श्री सुहास (आण्णा) कांदे यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाली. सदर मिटिंग मध्ये १९ फेब्रुवारी रोजीच इथून पुढे जयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन ठरले. तसेच जयंतीनिमित्त संपूर्ण शहर भगवे झेंडे लावून सजवणे तसेच सर्व शहरभर प्रतीमा पूजन, सामाजिक उपक्रम, अन्नदान, मिठाई वाटप व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीला सर्व आजी-माजी, ज्येष्ठ नेते यांची उपस्थिती होती.त्यावेळेस शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी उत्सव समितीची प्रस्तावना मांडली. राजाभाऊ भाबड, संजय कटारिया, माजी अध्यक्ष योगेश इमले, महेंद्र गरुड यांनी मनोगत व्यक्त केले माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सर्वांनी कोवीड नियमांचे पालन करून शासनाच्या निर्देशानुसार आपल्या महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात घरावर भगवा ध्वज लावून साजरी करण्याचे आवाहन केले. बैठकीला सूत्रसंचालन शहरउपप्रमुख जाफर मिर्झा यांनी केले.खालील प्रमाणे नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष – कयाम सैय्यद,कार्याध्यक्ष – अमजद मिर्झा उपाध्यक्ष – सतीश बहोत, सलीमभाई सोनावाला, रवी इप्पर, संजय दराडे,सचिव – विकास (पिंटू)वाघ ,सहसचिव – धीरज हिरे, मुन्ना धोंडगे,खजिनदार – निलेश ताठे,सहखजिनदार – अमजद शेख,बैठकीत उपस्थित असलेले तमाम शिवभक्त, शिवप्रेमी, शिवसैनिक,रमेश (आण्णा) हिरण, हरीश भाऊ आशर, संतोष बळीद, मुन्नाभाऊ दरगुडे, सुनील पाटील, अमीन पटेल, सुभाष माळवतकर, गोटू केकान, सुनील हांडगे, दिलीप तेजवानी, सुनील गवळी, महेंद्र शिरसाठ, विनय आहेर, प्रमोद पाचोरकर, महेश बोराडे, जुबेर शेख, सोनू पोहाल, बबन आव्हाड, प्रवीण (छोटू) धाकराव, संदीप व्यवहारे, सचिन नाईक, अंकुश गवळी, संतोष साळुंखे, हर्षल भाबड, दिनेश घुगे, सचिन दरगुडे, कचरू आव्हाड, पंडित सानप, प्रमोद आहेर, विजय ताथेड, अमोल दंडगव्हाळ, विकी सुरवसे, अमोल वाडेकर, विजय परदेशी, परेश राऊत, सर्वेश जोशी, निशांत पाटील, राहुल सांगळे, नितीन महाजन, राजेंद्र गायकवाड, विलास शेळके, आशु पोहल, संदीप व्यवहारे, सनी फसाटे, निलेश व्यवहारे, राकेश चव्हाण, दिपक दराडे, स्वराज करकाळे, गणेश पगार, ललित रसाळ, सुनील ताठे, शुभम खैरे,नंदू पीठे इ. शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here