पनवेल महानगरपालिका हद्दीमधील व्यापारी-दुकानदार यांच्यावर रात्री दहा वाजता दुकान बंद करण्याचे लावलेले निर्बंध त्वरित हटविने

0

मुंबई : माननीय आयुक्त साहेब,
पनवेल महानगरपालिका  विषय :- पनवेल महानगरपालिका हद्दीमधील व्यापारी-दुकानदार यांच्यावर रात्री दहा वाजता दुकान बंद करण्याचे लावलेले निर्बंध त्वरित हटविण्याबाबत…महोदय, वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की, covid-19 OMICRON या आजाराची सुरवात साधारण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाली. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये एका दिवशी 10 ते 15 जानेवारीच्या आसपास जवळजवळ 1500 रुग्ण ही उच्चांक पातळीवर आढळून आली. महानगरपालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार एका दिवशी 1500 रुपये आढळण्याचा आकडा आता 300 च्या खाली आलेला आहे. तसेच या लाटेमध्ये रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण एकदम नगण्य आहे. महानगरपालिकेकडून व्यापारी दुकानदार यांच्यावर रात्री दहा वाजता आस्थापना बंद करण्याच्या निर्बंधांमुळे खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. याशिवाय काही अधिकारी कर्मचारी यांच्याकडून व्यापारी दुकानदार यांची, निर्बंधाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे.तरी covid-19 OMICRON मुळे आलेली तिसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली असल्यामुळे, आणि रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य असल्यामुळे, पनवेल महानगरपालिका हद्दीमधील व्यापारी दुकानदार यांच्या अस्थापना रात्री दहा वाजता बंद करण्याचे निर्बंध तात्काळ प्रमाणे हटविण्यात यावे ही नम्र विनंती..( आपली विश्वासू,लीना गरड ,नगरसेविका व अध्यक्षा ,खारघर फोरम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here