
(अहमदनगर प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पांगरा येथील श्री क्षेत्र विठ्ठल गडावर महान तपस्वी संत वामनभाउ महाराज यांच्या छप्पणाव्या पुंण्यतीथी निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपात सांगता सोहळा संपन्न झाला. प्रथम विठ्ठल गडाचे भक्त बाळासाहेब कुत्तरवाडे यांनी संत वामनभाउ यांच्या मुर्तीचा सपत्नीक अभिषेक करून नंतर महापुजा केली.विठ्ठल गडाचे महंत रामक्रुष्ण शास्त्री महाराज यांच्या मधूर वाणीतून महासंकिर्तन संपन्न झाले.विठ्ठलगड चालक मालक कंपनीच्या वतीने विषेश सहकार्य करण्यात आले. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय ना.आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील कार्यालयिन अधिकारी अनंत तांदळे,एन् टी गर्जे पाटील, अमोलराजे तरटे,शिवाजी नाकाडे,भिमराव आव्हाड, काशिनाथ दहिफळे, देविदास भाबड,गायनाचार्य महादेव शिरसाट, वडुले खुर्द येथील सरपंच, पोलिस पाटील बाळासाहेब आव्हाड,महादेव आव्हाड, दिलिप तुतारे,गणेश आव्हाड, विठ्ठल गडाचे सर्व विश्वस्त, पांगरा येथील सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सदस्य यांच्या सह पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. एकादशीच्या दिवशी गडावर भाविकांची गर्दी होते अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या विठ्ठल गडाकडे जाण्यासाठी निट रस्ते नाहीत शासनाने सर्व रस्त्याच्या कामाचे खडीकरण आणि मजबुतीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात विठ्ठल गडाचा समावेश व्हावा अशी भाविकांची मागणी आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)
