जनजागृती सेवा समितीच्यावतीने विविध विषयांवरील पुस्तके ग्रंथसखा वाचनालयास भेट.

0

– बदलापुर-इलेक्ट्रॉनिक मिडीया,प्रिट मिडीया व काॅम्पुटरीय डिजिटल युगातही अल्पशा प्रमाणात का होईना,अजुनही वाचन संस्कृती टिकुन आहे.बदलापुरातील ग्रंथसखा वाचनालयातली वाचक हे वाचनालयाचे वैभव आहे.अशा ग्रंथसखा वाचनालयास पुस्तके भेट देण्याचा योग आला.आपल्याकडील वाचुन झालेली पुस्तके अशीच पडुन राहण्यापेक्षा ती ग्रंथसखा अशा नावाजलेल्या वाचनालयास भेट द्यावीत,हे मनात आले.आणि २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा समितीच्यावतीने ऊन पाऊस कथा,कविता संग्रह,मनोबल उंचावणा-या कथा,स्रियांचे परिपूर्ण आयुष्य,विविध विषयांवरील दिवाळी अंक,अशी विविध प्रकारची पुस्तके ग्रंथसखा वाचनालयास भेट देण्यात आली.जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,समिती कार्यकारिणी सदस्य दीपक वांयगणकर,सौ.भावना, ग्रुप सदस्य दिलीप नारकर,सुहास सावंत,राजेंद्र नरसाळे,विलास हंकारे यांच्या हस्ते ग्रंथसखा वाचनालयाचे सर्वेसर्वा,व्यवस्थापक श्री.शाम जोशी सर यांजकडे सुपुर्द करण्यात आली.शाम जोशी सरांनी विविध पुस्तकांसंदर्भात दाखल्यासहीत विविध प्रकारची पुस्तके,ग्रंथसखा वाचनालयाची व्यवस्था यासंदर्भात संपुर्ण माहिती दीली. व संस्थेच्यावतीने आपण माझ्या वाचनालयात कार्यक्रम आयोजित करा,मी स्वतः प्रख्यात साहित्यिक यांना आमंत्रित करतो,अशावेळी माझे मार्गदर्शन व पुर्ण सहकार्य असेल असे शाम जोशी सरांनी आश्वस्त केले.वाचन संस्कृती ही शहराच्या सुसंस्कृतपणाचा मानबिंदू आहे.आणि ही संस्कृती जोपासण्याचे काम करणारी वाचनालये ही सुसंस्कृत शहराचा केंद्रबिंदू आहे.आणि बदलापुर शहरातील ग्रंथसखा हे वाचनालय म्हणजे वाचक व ग्रंथालय असे अतुट नात आहे.ठाणे जिल्ह्यातील ग्रंथसखा हे वाचनालय अग्रणी आहे.ग्रंथालयाला पुस्तके भेट दिल्यानंतर ग्रंथसखा वाचनालयाच्यावतीने सौ.आशा निळकंठ,यांनी जनजागृती सेवा समितीने पुस्तके भेट दिल्याबद्दल आभार पत्र देण्यात आले.याप्रसंगी सौ.सुधा चव्हाण,सौ.सुप्रिया आरोटे,श्रीमती.वर्षा जोशी,श्रीमती.माणिक पटवर्धन या ग्रंथसखाच्या सहकारी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here