निंबोडी,कौडगाव, त्रिभुवनवाडी, तिसगाव साठी एक्सप्रेस पाईपलाईन मंजूर ः राजेंद्र म्हस्के

0

(अहमदनगर प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील निंबोडी, कौडगाव आठरे,त्रिभुवनवाडी,तिसगाव साठी जलजिवन मिशन योजने अंतर्गतपिण्याच्या पाण्यासाठी एक्सप्रेस पाईप लाईन मंजूर झाल्याची माहिती तिसगाव येथील व्रुदेश्वर अर्बन मल्टीपर्पज निधीचे चेरमन राजेंद्र एकनाथ म्हस्के यांनी दिली.राहुरी तालुक्यातील मुळा धरण परीसरात पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उर्जा, आदिवासी, नगरविकास व उच्च तंत्र शिक्षण राज्य मंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीस चेरमन राजेंद्र म्हस्के, तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे,कौडगावचे माजी सरपंच प्रुथ्वीराज आठरे, संतोष आठरे,त्रिभुवन वाडीचे आंबादास कारखेले,बाबासाहेब कारखेले,निंबोडीचे अण्णासाहेब भापसे,प्रविण कारखेले,म्हातारदेव कोरडे हे उपस्थित होते. वरील गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती.सतत ना.तनपुरे कडे कागदपत्रांचा पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्यासाठी ही योजना जलजिवन मिशन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस लाईन चिचोंडी येथून नवीन स्वतंत्र पाईपलाईन टाकून वरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ऐन दुष्काळी भागातील गावासाठी ही योजना मंजूर करण्यात आल्यामुळे ना.तनपुरेचे या भागातील कार्यकर्त्यांनी आभार मानून अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here