कलावंतांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे सरसावली सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनी..

0

मुंबई : सिने स्टार एंटरटेनमेंट आयोजीत
नुकतंच स्नेहलता राणे विद्यालय दादर या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर सर आणि वेस्टर्न इंडिया फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर असोशिशनचे सचिव दिलीप दळवी सर,यांच्या उपस्थितीत कलाकारांसाठी एक सभा व चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते. यांत अनेक कलाकार, तंत्रज्ञ, बँकस्टेज आर्टिस्ट तसेच ज्येष्ठ कलावंत सहभागी झाले होते. सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनीचे मालक श्री. मंगेश देवके यांनी “कलाकारांच्या उज्वल भविष्यासाठी” “कलावंत जगला तरच कला जिवंत राहील” या उद्देशाने खूप चांगल्या पद्धतीने या उपक्रमाची माहिती दिली. अभिनेते पाटकर यांनी कलावंतांच्या भविष्यासाठी विचार करणारी ही एकमेव संस्था असून प्रत्येक कलवंतानी यांत सहभागी झाले पाहिजे असे उत्तेजन दिले. तसेच दळवी यांनी सहभागी कलावंतांना अचूक मार्गदर्शन करून या संस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली याप्रसंगी उपस्थित सर्व कलाकार व ज्येष्ठ कलावंत मधु रेडकर, के राघवकुमार, संतोष धुरी, शेखर दाते, रामदास तांबे, सचिन पाताडे, सूर्यकांत कांबळी, महेश तेटांबे, कृष्णकुमार गावंड, सनी मुणगेकर, सुरेश डाळे, विनय गिरकर, प्रमोद मोहिते, सौ.अलका साळवे, दिनेश बर्वे, किशोर केदारे. आयोजक- नितिन साळवे, श्री. विजय खरात, नंदू धमापूरकर, केतन नेरुरकर आदी कलाप्रेमी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनीचे सर्वेसर्वा मंगेश देवके यांनी उपस्थित सर्व कलावंत व सन्माननीय प्रमुख पाहुणे यांचे आभार मानले. अशा प्रकारे हे चर्चासत्र खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. ( धन्यवाद,महेश्वर तेटांबे,सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार,९०८२२९३८६७ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here