साकेगावच्या बिरोबा माळावर हरिणाम सप्ताह संपन्न

0

प्रतिनिधी( सुनिल नजन) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगावच्या बिरोबा माळावर पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान च्या वतीने अखंड हरिणाम सप्ताह संपन्न झाला.ह.भ.प.मार्तंड महाराज तोगे यांच्या नेतृत्वाखाली आणि पांगऱ्याच्या विठ्ठल गडाचे मठाधिपती महंत ह.भ.प.रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.दररोज काकडा, भजन,प्रवचन, नवनाथ ग्रंथ पारायण,होमहवन,अन्नदान ईत्यादी उपक्रमांनी हा सोहळा संपन्न झाला.ह.भ.प.अर्जुन महाराज सोनवणे, लोणीकर यांच्या प्रवचनाने अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या प्रसंगी मच्छिंद्र पांगरे,आनंदा पवार,पंढरीनाथ फुंदे,नामदेव कराळे,भगवान पालवे,अनिल कटारिया, संदिप तवटे,गीरी महाराज, भागुजी खोसे,परशुराम वीर,लखन जगदाळे, दत्तू ढोबळे,अरूण मतकर, बाळासाहेब देवढे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर उपस्थित होते. ह.भ.प. रामकृष्ण महाराज शास्त्री यांनी या आश्रमासाठी पत्रे देण्याचे आश्वासन दिले. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. हा सोहळा २६ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here