नवी मुंबई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग संपन्न.

0

घणसोली – प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत- महेश तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग नुकतेच अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओ, दगडू पाटील चाळ, घणसोली गांव, येथे संपन्न झाले. याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे अध्यक्ष आणि अभिनेता गुरुनाथ तिरपणकर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड चे क्लब संस्थापक आणि अभिनेता राजेश कदम, छायाचित्रकार-संकलक सुनिल म्हात्रे, वर्षा म्हात्रे, लेखक-दिग्दर्शक अनंत सुतार, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, अक्षदा मोरे, अभिनेता सुरेश डाळे पाटील, संदीप रावजी जाधव, पत्रकार प्रमोद दळवी, रवीना भायदे, बालकलाकार, मधुरा म्हात्रे आदी कलावंत उपस्थित होते. नव्या वर्षात नवीन पर्वणी म्हणुन रसिक प्रेक्षकांना ओटीटी माध्यमातून ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन्ही लघु चित्रपटांच्या निखळ मनोरंजनाचा आस्वाद अनुभवायला मिळणार असे दिग्दर्शक महेश तेटांबे यांनी सांगितले आहे.( धन्यवाद,आर्यारवी एंटरटेनमेंट ,गुरुनाथ तिरपणकर (पत्रकार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here