
(अहमदनगर प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे आदिवासी, नगरविकास, उर्जा राज्य मंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे यांनी भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कासारपिंपळगाव ला सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाथर्डी तालुक्यातील प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. महावितरणच्या कारभारात सुधारणा करण्याच्या सुचना ना.तनपुरे यांनी विज अधिकाऱ्यांना दिल्या. विजेच्या लपंडावामुळे अनेक शेतकरी हैराण झाले आहेत. त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व विषयावर साधक बाधक चर्चा झाली. पाथर्डी तालुक्यातील विकास कामावर सर्व ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. असे आश्वासन ना.तनपुरे यांनी दिले.पुढे घाटशिळ पारगाव, आणि शिरूर कासार येथे विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी ना.तनपुरे रवाना झाले. यावेळी दोन्ही कांग्रेसच्या वतीने सचिन राजळे यांनी ना.साहेबांचा सन्मान केला. या प्रसंगी कासारपिंपळगाव गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सौ योगिता ताई राजळे,ज्ञानदेव राजळे,आबासाहेब म्हस्के, जयकुमार देशमुख, राजू शेख,बाळासाहेब राजळे,राजेंद्र राजळे,लाईनमन अनिल राजळे,अमोल वाघ,भारत वांढेकर,विजय टापरे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर )
