भगिनींनो मासळी  विकताना कायम मास्कचा वापर करा-ऍड, मानसी म्हात्रे,उपनगराध्यक्ष

0

अलिबाग:–आपली मासळी ग्राहकांना विकताना कायम मास्कचा व पैसे घेत व देत असल्याचे हातही स्वच्छ ठेवा,राज्यात ओमीक्रोन चा धोका असल्याने बाजारात पर्यटक मोठ्या संख्येने येतात म्हणून आपली व कुटूंबाची काळजी घ्या,अधिक सुरक्षा बाबत आपले रायगड भूषण जयपाल पाटील सांगतील असे उद्घाटन प्रसंगी आपले विचार मांडले .प्रारंभी पी.एन.पी.मार्केट च्या अध्यक्ष गीतांजली पेरेकर यांनी उपनगराध्यक्ष, जयपाल पाटील,सावतामाळी पत संस्था चे अध्यक्ष रमेश नाईक,माजी नगरसेवक आर.के.घरत,पत्रकार सचिन पावसे,आपत्ती व सुरक्षा मित्र पूजा पेडणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जयपाल पाटील यांनी स्वयंपाक घरातील गैस ची सुरक्षा,विजेची सुरक्षा, मुलाची सुरक्षा व पाणी वापराची सुरक्षा ची माहिती दिली आणि सरकारी व अलिबाग नगरपालिकेच्या सूचना चे काटेकोर  पालन करा असे सांगून अपघात व बाळतपणा साठी 108 रुग्ण वाहिका चा वापर कसा करायचा यासाठी तिला कॉल करताच 20 मिनिटात  डॉक्टर जयप्रकाश पांडे व पायलट स्वप्नील म्हात्रे उपस्थित राहिले. हा कार्यक्रम यशव्वी करण्यास संध्या पेरेकर, नयना तांडेल ,पूनम तबिब, नयना कोरलेकर,भारती रामनाथकर, गीता मुकादम, दत्ता तांडेल, रंजिता पाटील,आपत्ती व सुरक्षा मित्र विकास रणपिसे, सोगावकर,मंगेश राऊत,सुरेश खडपे,प्रसाद ठाकूर पत्रकार सचिन पावसे, पूजा पेडणेकर यांनी परिश्रम घेतले,रायगड चा युवक फॉउडेशनतर्फे मासळी विक्रेता व ग्राहक 200 जणांना मोफ़त मास्कचा वाटप करण्यात आले,शेवटी आभार विनोद उंदिरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here