मनमाड जय भवानी व्यायाम शाळेच्या खेळाडूंची सुवर्णझेप

0

नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – मलकापूर जिल्ह्यातील बुलढाणा येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युथ जूनियर व सीनियर केटाली
कॉन स्पर्धात मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळा खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करत संपादन करून सुवर्णझेप घेतली.महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेत दर्जेदार खेळांचे प्रदर्शन केले. आकांक्षा किशोर व्यवहारी येणे 40 किलो वजनी गटात 125 किलो वजन उचलून आपल्या पहिल्याच राज्य स्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले व युथ वेस्ट लिफ्टर चा बहुमान पटकावला.तसेच दिया किशोर व्यवहारी जुने 45 किलो वजनी गटात 125 किलो वजन उचलून एक सुवर्ण एक रौप्य व एक कास्य पदक पटकावले. निकिता वाल्मीक कसबे हिने 71 किलो वजनी गटात 183 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तर धनश्री विनोद बेडाने हिने 81 किलो वजन गटात 140 वजन उचलून सुवर्णपदक पटकावले, वैष्णवी जनार्दन उगले हिने 64 किलो वजन गटात 126 किलो वजन उचलून रौप्या पदक पटकावले, मुकुंद संतोष आहेर यांने 55 किलो वजन गटात 203 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले, राजेश परदेशी याने 61 किलो वजन गटात 190 किलो वजन उचलून वजन उचलून रौप्य पदक पटकावले, अमृता भाऊसाहेब शिंदे हिने 45 किलो वजन गटात 143 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले, वैष्णवी वाल्मीक इप्पर हिने 59 किलो वजनी गटात116 किलो वजन उचलून कास्य पद पटकावले, श्रावणी विजय पुरंदरे, जयराज राजेश परदेशी, करुणा रमेश गाढे यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यशस्वी खेळाडूंनी छत्रे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रवीण व्यवहारे, ए आय एस प्रशिक्षक तृप्ती पाराशर, तुमचे मार्गदर्शन लाभले. छत्रे विद्यालयाचे पीजी धारवाडकर, अध्यक्ष, डिडोकसर, सचिन दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापिका सौ के एस लकी टवले, उपमुख्याध्यापक आर एन थोरात, पर्यवेक्षक संदीप देशपांडे, जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळा चे मोहन अण्णा गायकवाड, डॉक्टर विजय पाटील, नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्राध्यापक दत्ता शिंदे आदींनी वरील स्पर्धकांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here