हवामान अभ्यास आणि योग्य मशागती शिवाय पर्याय नाही-पंजाब डख

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) हवामान अभ्यास आणि योग्य मशागतीशिवाय शेती व शेतकऱ्याला पर्याय नाही असे मत हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आमठाणा येथील शेतकरी मार्गदर्शन पर कार्यक्रमात केले.सिल्लोड तालुक्याचे माजी सभापती अशोक गरुड व घाटनांद्रा ,आमठाणा परिसरातील मित्र परिवाराच्या वतीने हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या सन्मान सोहळ्याचे व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सत्कार सोहळ्याला उत्तर देतांना पंजाबराव डख म्हणाले की,शेतीत जीव ओतून काम केल्यास आपल्या आयुष्याचे भविष्यकार आपणच होऊ शकतो, पीक पेरणी असो की इतर मशागत करतांना हवामान अंदाजाचा अचूक अंदाज करून शेती पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेती नक्की परवडेल. पिकवलेला माल योग्य दरात विक्री होईल. यासाठी योग्य बाजारभाव व योग्य बाजारपेठ या बाबतही नियोजन हवे. आपल्या पूर्वजांनी पाणी,हवामान या विषयी निसर्ग व निसर्गामध्ये होणारे वेळोवळचे बदल लक्षात घेऊन अनेक अचूक अंदाज बांधल्याचे आपणास पाहावयास मिळते.निसर्गाचा अनुभव हाच खरा हवामान अंदाज असून त्यानुसार शेतीशी निगडित विविध विषयाचे नियोजन करणे आवश्यक आहे. बळीराजा व शेती ही भारतीय अर्थक्रांतीच्या साखळीतील महत्वाचा घटक असून तो टिकला पाहिजे या निस्वार्थी भावनेतून मी विद्यार्थी दशेपासून ते आजतागायत पर्यत हवामानाचा अभ्यास करत आलो असून यामुळेच हवामानाचा अचूक अंदाज बांधत आलो आहे. आणि आपल्या सर्वांच्या विश्वासाने मला त्यात यश मिळत गेले. असेही त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
कृषी प्रधान भारत देशाचा शेतकरी हा खरा कणा असून कमी मशागत,कमी खर्च बरोबर अधिक उत्पन्न हे सूत्र प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी तूर, हरभरा आदी पिकांचे उत्पादन घेणे काळाची गरज असून नक्कीच या पिकांमुळे शेतकऱ्याची आर्थिक भरभराट होईल हे त्यांनी स्वतःच्या स्वनुभवावरून सांगितले.शिवाय वादळ वारे, वीजा, अवकाळी पावसापासून संरक्षण बाबत घ्यावयाची काळजी बाबातही मार्गदर्शन केले.अशोकदादा गरुड़ यांच्या व मित्रपरिवार वतीने पंजाब डख यांचा नागरी सत्कार तर आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी माजी आमदार सांडूअप्पा लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव दानेकर,सचिन चौधरी,संजयजी डमाळे,रामचंद्र मोरे,अरुण मोरे, सुभाष लोखंडे, रघुनाथ कदम,पांडुरंग कदम, अनिल खरात, तुळशीराम मोरे,सोनाप्पा पारखे, काकासाहेब मोरे, काशिनाथ सोमासे,माधवराव सोमसे, रामेश्वर गवते, किरण करडेल,, प्रभाकर ठोंबरे, सचिन चोबे,पोपट कुंटे,शेवंतराव मोरे,पंढरीनाथ कदम,पंढरी मुरकुटे,विकास मुळे, पुंडलिक दिवटे,संजय अंभुरे ,कैलास तायडे , शिवाजी ड़फळ, कैलास दिवटे ,विजय महाजन,तातेराव सुस्ते, साहेबराव अंभुरे,लतीप बापू ,बाळू बनसोड,राजू दाभाडे ,सोमनाथ कोल्हे ,संतोष मोरे,काशीनाथ वाघमोडे,कृष्णा आमटे ,अंकुश वाघमोडे,संतोष दिवटे ,संजय चौधरी,उत्तम मोरे,माधवराव गवते,श्रीकांत डफळ, श्री.जगनभाऊसह परिसरातून हजारो शेतकरी उपस्थित होते...शेतकरी वर्गाकडून जागोजागी सत्कार पंजाबराव डख सिल्लोड येथून आमठाणा येथे नियोजीत कार्यक्रमासाठी जात असतांना विविध गावाच्या ठिकाणी चौकाचौकात ,बस स्थानक आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.आजची लाखो शेतकऱ्यांच्या व चाहत्यांच्या मोबाईल मध्ये पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर संग्रहित असून हीच पंजाबराव डख यांच्या कामाची पोच आहे. आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप चे सुमारे हजार पेक्षा जास्त ग्रुप च्या माध्यमातून हवामानाचा अंदाज ते शेतकऱ्यांपर्यत पोचवण्याचे कार्य करीत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here